Published On : Tue, Sep 8th, 2020

खापरखेडा वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्यांच्या नियुक्ती मध्ये भष्ट्राचार

Advertisement

– महाजेनकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिले चौकाशीचे आदेश,वीज केंद्र परिसरात खळबळ

नागपुर – स्थानिक औष्णिक वीज केंद्रातील मुख्य अभियंता प्रकाश खंडारे त्यांच्या गलथान कारभारामुळे मागील अनेक महिन्यापासून चांगलेच चर्चेत आहेत महाजेनकोच्या मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती “२०१७” अंतर्गत खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांनी निवड करण्यात आली मात्र मुख्य अभियंता पदाकरीता निवड समितीच्या माध्यमातून १० गुण वाढवून पदोन्नती मिळवून घेतल्याचा प्रकार प्रसार माध्यमात नुकताच उघडकीस आला असून संपूर्ण महाराष्ट्र व वीज केंद्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे यासंदर्भात अध्यक्ष तथा महाजेनकोच्या व्यवस्थापकीय संचालक (महानिर्मिती) यांनी चौकाशीचे आदेश दिले असून चौकाशी पूर्ण होई पर्यंत मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांना निलंबित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

महाजेनकोच्या मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती “२०१७” अंतर्गत मुख्य अभियंत्यांच्या ३ पदासाठी २२ में २०१७ रोजी भर्ती प्रक्रिया राबविण्यात आली ३ पदामध्ये १ ओपन, १ ओबीसी, १ एससी अशी पदे आरक्षित करण्यात आली सदर भर्ती प्रक्रिये अंतर्गत १२ ईच्छूक उमेदवारांनी वैयक्तिक मुलाखाती दिल्या होत्या यात ३ उमेदवारांची मुख्य अभियंता पदासाठी निवड करण्यात आली मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती प्रक्रियेत ७० गुण लेखी परिक्षा व ३० गुण प्रत्यक्ष मुलाखाती करिता देण्यात आले होते मात्र मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती प्रक्रियेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला सदर भर्ती प्रक्रियेत खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांनी सुद्धा वैयक्तिक मुलाखात दिली होती खंडारे यांना लेखी परीक्षेत ४०० गुणांपैकी २३२ गुण प्राप्त झाले अर्थात ७०% गुणा पैकी त्यांना ४०.६०% गुण मिळालेत तर प्रत्यक्ष मुलाखातीत ३० पैकी १७ गुण मिळाले त्यांची एकूण टक्केवारी ५७.६०% ईतकी आहे मात्र निवड समितीने प्रकाश खंडारे यांची मुख्य अभियंता पदी निवड करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने १० गुण वाढवून ६७.६०% गुण वाढवून देण्यात आले त्यामूळे उर्वरित उमेदवारांवर जाणीवपूर्वक अन्याय करून त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप प्रसार माध्यमांच्या माध्यमातून करणयात आला आहे.

मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती निवड प्रक्रियेत आर्थिक उलाढाल
२२ मे २०१७ रोजी मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती प्रक्रिया महाजेनकोच्या वतीने राबविण्यात आली सदर निवड समिती मध्ये वीज निर्मिती कार्यकारी संचालक चंद्रकात थोटवे, पूर्व अध्यक्ष तथा व्यस्थापकीय संचालक विपीन श्रीमाळी, श्याम वर्धने, के. एम. चिरुटकर, ए. आर. नंदनवार, विनोद बोन्द्रे, व्हि. एम. जयदेव, जे. के.श्रीनिवासन अश्या आठ दिग्गजांचा समावेश करण्यात आला होता मात्र निवड समितीत असलेल्या दिग्गजांना प्रकाश खंडारे यांना लेखी परिक्षेत मिळालेल्या ४०.६०% व त्यांना प्रत्यक्ष मुलाखातीत मिळालेल्या १७ गुणांची ५७.६०% बेरीज करण्यात आली नाही उलट निवड समितीत असलेल्या दिग्गजांनी संगनमत करून १० गुण वाढवून ६७.६०% गुण वाढवून प्रकाश खंडारे यांची मुख्य अभियंता पदी निवड केली सदर गुण पत्रिकेवर निवड समिती मधल्या सर्व आठही दिग्गजांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती प्रक्रियेत असणाऱ्या निवड समिती मधल्या दिग्गजांकडून मुख्य अभियंता पदी पात्र उमेदवारांची निवड करने अपेक्षित होते मात्र मोठया प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्यामुळे पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी दिले चौकाशीचे आदेश
मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती प्रक्रियेत मुख्य अभियंता पदी निवड करतांना मोठा घोटाळा झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमात झळकल्या त्यामुळे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी चौकाशीचे आदेश दिले असून कार्यकारी संचालक (प्रकल्प) एस. एम. मारुडकर यांची नियुक्ती केली आहे मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती प्रक्रियेतील सर्व दस्ताऐवज व कागदपत्रे मुख्य महाव्यास्थापक (मांस) यांच्याकडून प्राप्त करून तपासणी व चौकाशी करून वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश अध्यक्ष तथा व्यस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी दिले आहेत

चौकाशी पूर्ण होई पर्यंत मुख्य अभियंत्यांना निलंबित करा
मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती मध्ये घोटाळा झाल्याचे प्रसार माध्यमात उघड झाल्यामुळे अध्यक्ष तथा व्यस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी चौकाशीचे आदेश दिले आहेत मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती प्रक्रियेत मुख्य अभियंता पदी निवड झालेले प्रकाश खंडारे खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत आहेत त्यांच्यावर आरोप झाल्यामुळे त्यांना चौकाशी समितीला सामोरे जावे लागणार आहे खंडारे मुख्य अभियंता पदावर कार्यरत असल्यामुळे मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती घोटाळ्यातील सर्व पुरावे दडपण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे त्यामुळे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांना चौकाशी पूर्ण होई पर्यत निलंबित करण्याची मागणी होत आहे.यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता चर्चा करून एक दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितले.

नागपूरकर असलेले ऊर्जा मंत्री कार्यवाही करणार का ?
मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती प्रक्रिया भाजप व मित्र पक्षाच्या कार्यकाळात राबिण्यात आली मुख्य अभियंता पदावर निवड करतांना निवड समितीने संगनमत करून घोटाळा केला प्रकाश खंडारे यांची मुख्य अभियंता पदी निवड करतांना त्यांचे १० गुण वाढविण्यात आले मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती अंतर्गत निवड समितीने हेतुपुरस्सर पात्र उमेदवारांना डावलण्यात आले त्यामूळे सदर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले नागपूरकर असलेले ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या गृह जिल्ह्यात खापरखेडा औष्णिक वीज केंद्र आहे सदर वीज केंद्रात मुख्य अभियंता प्रकाश खंडारे कार्यरत आहेत शिवाय खंडारे हे ऊर्जा मंत्र्यांचे जवळचे नातेवाईक असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे त्यामुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत मुख्य अभियंता प्रकाश खंडारे व मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती निवड समिती मधल्या दिग्गजांवर कार्यवाही करतील का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चंद्रकांत थोटवे कार्यकारी संचालक पदावरुन सेवानिवृत्त,अनेकांचा अपेक्षाभंग
काही विशिष्ठ कंत्राटदार व पुरवठादारांसह ठरावीक लोकांच्या गोटातील अधिकारी म्हणुन ख्यातीप्राप्त व नागपुरकरांची मर्जी संपादन केलेले चंद्रकांत थोटवे हे आपल्या कार्यकारी संचालक (मुंबई) या पदावरुन आज रितसर सेवानिवृत्त झाले आहेत.सेवानिवृत्तीच्या अगदी दोन दिवस आधी त्यांना डायरेक्टर ऑफ ऑपरेशन बोर्ड या महत्वपुर्ण पदावर वर्णी लावण्यासाठी अनेकांनी ‘ फिल्डींग ‘ लावली यासाठी पात्र ऊमेदवारांना डालऊन सत्तेचा ऊपयोग चालविला गेला अर्थात या मागे काही कंत्राटदार,मर्जीतील मुख्य अभियंते व सप्लायर यांची ‘ अर्थ ‘ पुर्ण ताकदही आहेच.दरम्यान श्री.थोटवे यांना महाजनकोने आज हातात नारळ दिला,ईतकेच नव्हे तर त्यांना दिलेला डायरेक्टर ऑफ ऑपरेशन बोर्ड चा पदभारही त्यांनी राजु बुरडे ( मुंबई ) यांच्याकडे सोपवावा लागला आहे.या महत्वपुर्ण पदासाठी मोठी सहापदरी डील झाल्याची नागपुर मुंबईत चर्चा आहे.हा चार्ज श्री.थोटवे यांना न मिळाल्याने ‘ फिल्डींग ‘ लावणार्‍यांचे धाबे दणाणले असुन ईमानदार व सचोटीने काम करणारे अधिकारी कंत्राटदार यांच्यात मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.