Published On : Fri, May 13th, 2022

मनपा- OCW ची कार्यवाही : ५१ टुल्लू पंप विविध भागातून जप्त

Advertisement

टुल्लू पंपाचा वापर बंद करा, अन्यथा सक्त कारवाई ला सामोरे जा

नागपूर : मानेवाडा भागातील निवासी श्री मुनीश्वर ह्यांनी नुकतीच तक्रार केली होती कि त्यांच्या घरी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यांच्या तक्रारींवर काम करण्यासाठी मनपा-OCW हनुमान नगर झोन ची चमू गेली असता असे लक्षात आले कि त्यांच्याच घरी नाही तर संपूर्ण गल्ली मध्ये कमी पाणी येत आहे. चमूने आणखी खोलात जाऊन तपासणी केली तेव्हा कळले कि श्री विजय यांच्या शेजारील शिव अपार्टमेंट येथे नागरिकांनी अवैध रित्या बुस्टर पंप डायरेक्ट नळाला लावलेला आहे . कार्यवाही करीत बुस्टर पंप लगेच काढण्यात आला आणि आता व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे .

शहरात घडलेले फक्त एक प्रकरण नाही तर नागपूर शहरात येणाऱ्या १० झोन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अश्या जवळपास बऱ्याच तक्रारी दररोज येत आहेत आणि जेव्हा महानगर पालिका आणि OCW ची चमू चेक करायला जाते तेव्हा नळावर जोडलेला बुस्टर पंप आढळतो आणि तो उचलून आणावा लागत आहे. नुकतीच मनपा – ने हनुमान नगर झोन अंतर्गत भीम नगर, पार्वती नगर आणि शिव नगर, लक्ष्मी नगर झोन अंतर्गत अजनी आणि खामला , धरमपेठ झोन , सतरंजीपुरा झोन अंतर्गत बिनाकी आणि आसीनगर झोन अंतर्गत निरनिराळ्या वस्त्या मध्ये कार्यवाही केलेली आहे आणि त्याअंतर्गत जवळपास ५१ टुल्लू पंप पकडले आहेत.

बरेच तक्रारकर्ते (नाव न सांगण्याच्या अटीवर ) म्हणतात, “आमच्या मागच्या गल्लीत ३-४ तास नळ असतो. फक्त उन्हाळ्यात च मात्र आमच्या आणि आजूबाजूच्या १०-१२ घरांना पाणी मिळू शकत नाहीये. मागच्या काही दिवसापासून बारीकशी धार येतंय आणि पाणी मिळत नाहीये. आमच्या घराजवळ (शेजारी) नळाला लोक टिल्लू पंप लावतात अशी शंका आम्हाला आहे. पण नातेसंबंध मुले रीतसर तक्रार करता येत नाही.

कृपया यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला वणवण करावी लागत आहे. “ अशाच प्रकारच्या तक्रारी बरेच झोन मधून येत आहेत.

नागपुरातील उन्हाचा पारा 44 डिग्रीच्या आसपास पोचलेला आहे. शहरातील उंच भागातील विहिरीचे आणि बोरवेल चे पाणी देखील आटलेले आढळून येत आहे. वाढत्या उन्हामुळे सर्वी कडे कूलर्स चा वापर पण मोठ्या प्रमाण होताना दिसून येत आहे आणि अशावेळी अनेकदा नागरिक स्वत; च्या वापराकरिता बेकायदेशीररीत्या बूस्टर (टुल्लु) पंप वापरून जास्तीचे पाणी घेण्यास सुरुवात करत असल्याचे चित्र दिसून येते.

अशातऱ्हेने हे लोक इतरांसाठीचे अर्थात शेजार्यांचे (मित्र नातेवाईकांचे) पाणी हिसकावून घेत असतात. हे केवळ बेकायदेशीरच नसून अनैतिकदेखील आहे. बूस्टर पंपाचा वापर मनपाच्या पाणी उपविधीनुसार दंडनीय अपराध आहे व असा वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येऊ शकते. मनपा पाणीपट्टी दर उपविधीनुसार बूस्टर पंप अथवा तत्सम उपकरण वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. यावर्षी, मनपा-OCWने बूस्टर पंप वापरणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई तसेच नळजोडणी स्थगितीची कारवाई देखील ह्या अंतर्गत करू शकते ..हे येथे ऊल्लेखनीय आहे.

नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या पंप जप्ती मोहिमेच्या अंतर्गत मनपा-OCWने जवळपास ५१ पंप जप्त केले आहेत. हे पंप धरमपेठ झोन : ६ , आशीनगर झोन : २० आणि धंतोली झोन : १ , सतरंजीपूर झोन: ७, हनुमान नगर झोन : ४, नेहरू नगर झोन : ११ आणि लक्समि नगर झोन : २ मधून जप्त करण्यात आले आहेत . मनपा-OCWने मनपा डेलिगेट व OCW झोन मॅनेजर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस संरक्षण मध्ये आज पासून आकस्मिक भेटी देऊन दोषींवर कारवाई करण्यासाठी दहा ही झोनमध्ये विशेष पथके तैनात केली आहेत.

येथे उल्लेखनीय आहे कि, नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांनी बूस्टर पंपाचा सर्रास वापर होणारे भाग -१० हि झोन मध्ये ओळखून ठेवलेले आहेत. कारण ह्या भागातून कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याच्या खूप तक्रारी येत आहे . जसे की

नेहरू नगर झोन : नंदनवन, हसनबाग राजेंद्र नगर, चिटणवीस नगर, धन्वंतरी नगर, डायमंड नगर,

धरमपेठ झोन अंतर्गत : फुटाळा वस्ती, संजय नगर, कांचीपुरा वस्ती
सतरंजीपुरा झोन अंतर्गत : स्वीपर कॉलोनी , कावरा पेठ , बांगडे प्लॉट , तेलीपुरा पेवठा, पंचम गली, वंजारी, नागसेनवन मोमीन पुरा, पानई पेठ,

धंतोली झोन अंतर्गत : सावित्रीबाई फुले नगर, म्हाडा कॉलोनी, ताज नगर, बाबुळखेडा, रघुजी नगर , सोमवारी वसाहत, सिरसपेठ , वकील पेठ, चंदन नगर, जुनी शुक्रवारी ..

हनुमान नगर झोन अंतर्गत : रहा टे नगर टोळी, अमर नगर, नवीन अमर नगर, गजानन नगर, जानकी नगर, महाकाली नगर, बाबुळखेडा , पार्वती नगर

मंगळवारी झोन अंतर्गत: मानकापूर, बाबा फरीद नगर, फरस, आणि गांधीबाग झोन अंतर्गत: नवाबपूरा, भूतेश्वरर नगर , भालदारपुरा, मानपूरया -स्वीपर कॉलोनी, जाटतरोडी १,२,३ आणि कर्नल बाग आणि इतर भागात बेकायदेशीररीत्या बूस्टर (टुल्लु) पंप मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत.

मनपाच्या पाणीपट्टी उपविधीनुसार ‘मुख्य जलवाहिनीला टुल्लू पंप अथवा तत्सम उपकरण लावून पाणी घेतल्यास कार्यकारी अभियंता किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी अशा उपकरणाचा वापर करणाऱ्याचा पाणीपुरवठा खंडित करू शकतात तसेच हे उपकरण जप्त करू शकतात आणि त्या ग्राहकावर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येऊ शकते.

OCW-मनपाने नागरिकांना बूस्टर पंप न वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जागरूक नागरिकांना असेही आवाहन केले आहे कि, कुठेही बूस्टर (टुल्लू) पंप वापर आढळून आल्यास OCWच्या २४x७ नि:शुल्क मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर तक्रार करू शकतात अथवा झोन मॅनेजर/मनपा डेलिगेटला मनपा-OCW झोन कार्यालयात संपर्क करू शकतात.