Published On : Mon, Mar 30th, 2020

CoronaVirus Update : पुण्यात करोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

देशाबरोबरच राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. राज्यात सोमवारी सकाळी १२ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं.

यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. दरम्यान, पुण्यात करोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली.

राज्यात पहिला करोनाग्रस्त रुग्ण पुण्यात सापडला होता. मात्र, आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. दुर्दैवानं सोमवारी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.