Published On : Sun, Apr 12th, 2020

Coronavirus Nagpur Update : नागपूर एकूण 14 जण कोरोना पॉझिटीव्ह

Advertisement

नागपूर: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. नागपुरात आणखी तब्बल 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सकाळी 2 आणि आता 12 म्हणजे आज एकूण 14 जण कोरोना पॉझिटीव्ह आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकहून आलेले तबलिगी असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आजच्या वाढलेल्या रुग्णांमुळे नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता 41वर पोहोचली आहे. प्रशासन आणि नागपूरकरांसाठी ही चिंतेत बाब आहे. यावर खबरदारी म्हणून नागपूर पालिकेकडून रुग्ण सापडलेला परिसर सील करण्यात आला असून, या रुग्णांच्या संपर्कात कोणी आलं होतं का याचा तपास सध्या सुरू आहे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 134 रुग्णांची संख्या वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 113 रुग्ण हे मुंबईतच आढळले आहे.

महाराष्ट्राला कोरोना व्हायरसने घातलेला विळखा वाढतच चालला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही 1895 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात मुंबई, पुणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

कोरोनाचं व्हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत 113 रुग्ण आढळले आहे. वरळी, कोळीवाडा, धारावी आणि उपनगरात नवे रुग्ण आढळले आहे. वसई आणि विरारनंतर आता मीरा भाईंदरमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे. आज सकाळपर्यंत मीरा भाईंदरमध्ये 7 नवे रुग्ण आढळले आहे. तर पुण्यात 4 रुग्ण आढळून आले. नवी मुंबई, ठाणे महापालिका, वसई विरार इथं प्रतेकी 2 रूग्णांची वाढ झाली आहे. तर रायगड, अमरावती, भिवंडीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

Advertisement
Advertisement