कोरोनाचा प्रादुर्भाव बावनकुळे यांचा सतर्कतेचे आवाहन

Advertisement

नागपूर: कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात दहशत माजवली असतानाच नागपूर जिल्ह्यातील जनतेने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सतर्क राहावे. जास्तीत जास्त स्वच्छता बाळगावी

असे आवाहन माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, खाद्य पदार्थ खाताना ते चांगले आहेत की नाही याची खात्री करून घेणे, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे, शक्य झाल्यास मास्कचा वापर करणे. मुख्य

म्हणजे कोरोनामुळे घाबरून जाऊ नये. सतर्कता आणि स्वच्छता जास्तीत जास्त ठेवावी. आरोग्य विभागातर्फे योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. पण नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यकत आहे.

होळीच्या शुभेच्छा
आगामी होळीचा आणि रंगपंचमीचा सण साजरा करताना यंदा अत्यंत साधेपणाने साजरी करावी. पाण्याचा अधिक वापर करू नये, चिनी रंगांचा वापर करू नका. केवळ शुभेच्छा देऊन साजरी करा. रंगपंचमी साजरी करताना पर्यावरण खराब होणार नाही यााची दक्षता असे सांगत माजी पालकमंत्र्यांनी होळी व रंगपंचमीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.