Published On : Wed, Oct 14th, 2020

पोलिस स्टेशन व आरोग्य केन्द्रातील कोरोना योद्धांचा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघतर्फे सत्कार

खापरखेडा :- कोरोना काळात आपल्या जीवाची व आरोग्याची परवा न करता दिवसरात्र अथक परिश्रम करून आपले कर्तव्य बजावणारे स्थानिक पोलिस विभाग आणि आरोग्य विभागातील कोरोना योद्धांचा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले .

कोरोना सारख्या महामारीच्या काळात संपूर्ण राज्यात अनिश्चित लॉकडॉउन व वारंवार जनता कर्फ़्यू घोषित करण्यात आले होते . अश्या परिस्थिति कायदा व व्यवस्था सख्तीने कायम ठेवणे , वरिस्ठ अधिकारी व शासनाच्या आदेशांचे कसोटीने पालन करण्यात स्थानिक पोलिस विभागाने कोणतीही कसर सोडली नाही . सोबतच वाढत्या कोरोना पेशंटची संख्या पाहता अव्यवस्था होवू नये म्हणून स्थानिक आरोग्य विभाग़ाने सुद्धा कोणतीही हयगय न करता आपल्या कर्तव्याचे सजगतेने परिचय दिला . दिवसेंदिवस वाढते कोरोना पेशंट , कमी मनुष्यबळ , अपूरे साधनसामग्री , खाजगी समस्या , स्वताचे आरोग्य , रद्द झालेल्या सुट्टया, अतिरिक्त कामाचा बोझा व आपातकालीन कार्य , अशे कोणतेही कारणांना न जुमानता कर्तव्यदक्षतेने आपले कार्य व जवाबदारी दोन्ही विभागाने पार पाड़ली आहे . या गंभीर परिस्थिती मध्ये पोलिस विभाग व आरोग्य विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉजिटिव झालेत तर कोरोनामुळे काहिंचा दुर्दैवी मृत्यु सुद्धा झाला .
पोलिस विभाग व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या या कार्याची गंभीर दक्षता घेवून त्यांच्या या उत्कृष्ठ आणि मानवतेला जोपसणाऱ्या कार्याचे आभार व्यक्त करण्यासाठी स्थानिक पोलिस विभाग आणि आरोग्य विभागातील कोरोना योद्धांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करने आणि त्यांचे मनोबल वाढवन्याचा उपक्रम माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तर्फे संपूर्ण राज्यात राबविन्यात येत आले.

त्यानिमित्त माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे राज्य कार्याध्यक्ष शेखऱ कोलते आणि जिल्हा सचिव आरिफ पटेल यांनी स्थानिक खापरखेडा पोलिस स्टेशन आणि पारशिवनी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व स्टाफ , प्राथमिक आरोग्य केंद्र चिचोली खापरखेडा व प्राथमिक आरोग्य केंद्र पारशिवनीचे चिकित्सा अधिकारी व स्टाफ यांचे कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र सहित सत्कार केला.