Published On : Wed, Sep 23rd, 2020

भंडारा व गोंदियात 24 सप्टेंबरला कोरोना आढावा बैठक

· गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार

· खासदार प्रफुल्ल पटेल यांचा पुढाकार


भंडारा : कारोना रुग्णांच्या आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी येत्या 24 सप्टेंबरला भंडारा व गोंदिया येथे आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत.

राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी या दोन्ही जिल्ह्याच्या कोरोना रुग्णांसाठी असलेल्या आरोग्य सुविधांचा आढावा बैठक घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आढावा बैठकीपूर्वी दुपारी 12.30 वाजता भंडारा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयास भेट दिली जाणार आहे. यात आरोग्य सुविधांची पाहणी करणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यासह कोरोनाच्या संदर्भात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे.

गोंदिया येथे सायंकाळी 6 वाजता गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या उपाययोजनांच्या संदर्भात आढावा घेतला जाणार आहे. यावेळी राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.