Published On : Wed, May 28th, 2025
By Nagpur Today Nagpur News

कोरोना पुन्हा डोके वर काढतोय;महाराष्ट्रात ६६ नवे रुग्ण, देशभरात आकडे वाढतायत

नागपूर: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय. बुधवारी सकाळपर्यंत देशात १०४७ सक्रिय रुग्ण नोंदवले गेले असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात एकाच दिवशी ६६ नवे रुग्ण सापडले आहेत, यातील तब्बल ३१ रुग्ण मुंबईतून आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३२५ वर पोहोचली आहे.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय सुरू झाले आहेत. जेजे रुग्णालयात १५ खाटांचा स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे.

Gold Rate
12 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,100 /-
Gold 22 KT ₹ 1,02,400 /-
Silver/Kg ₹ 1,28,300/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोग्य मंत्रालयाने २६ मे रोजी शेवटचा अधिकृत डेटा प्रसिद्ध केला होता. त्यावेळी देशात १०१० सक्रिय रुग्ण होते, परंतु आता ही संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. उत्तर प्रदेशातही १० नवीन रुग्ण आढळले आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी तयारी सुरू केली असून विविध राज्यांमध्ये रुग्णालयांना मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Advertisement
Advertisement