Published On : Sat, Aug 1st, 2020

रेल्वेत वाढतोय कोरोना,अनेक विभागात बाधित

नागपूर: आरपीएफ आणि रेल्वे रुग्णालयानंतर आता इतर विभागातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कर्मचाèयात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्यातरी बाधितांची संख्या वाढत असल्याने कर्मचाèयांत qचतेचे सावट आहे.

दरम्यान खबरदारीची उपाययोजना म्हणून विभागीय रेल्वे व्यवस्थापक, वैद्यकीय अधिक्षक आणि रेल्वे संघटना यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना रॅपीड टेस्ट किट घेण्याचा प्रस्तावा संघठनेकडून ठेवण्यात आला. मात्र, तो प्रस्ताव आजही विचाराधिन आहे. सध्या रेल्वे रुग्णालय, आरपीएफ, कॅरीज अ‍ॅण्ड वॅगन, स्टेशनवरील लॉबी या ठिकाणीही कोरोना बाधित मिळत असल्याने कर्मचाèयात भीती पसरत आहे.

Advertisement

दरम्यान रेल्वे स्थानकावरील एका विभागाचा अभियंता आणि लॉबीतील ३ कर्मचारीही बाधित असल्याचा अहवाल आहे. रेल्वे सुरक्षा दलातील काही जवानांवर उपचार सुरू असून आठ कर्मचारी ठणठणीत झाले. खबरदारीची उपाययोजना म्हणून बाहेरून आलेले तसेच रेल्वे गाडीत नागपूर ते मुंबई दरम्यान स्काqटगसाठी गेलेल्या जवानांना विलगिकरण ठेवले जात आहे.

रेल्वे रुग्णालयात मिळालेल्या बाधित परिचारीनंतर रुग्णालयात बाधितांची संख्या वाढत गेली. यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना गरजेची आहे. रॅपीड टेस्ट कीट प्रस्तावावर अंमलबजावनी झाली असती तर कर्मचाèयांना दिलासा मिळाला असता. आता बाधितांची संख्या वाढत असल्याने कर्मचाèयात qचतेचे वातावरण आहे.

तीन उमेदवार बाधित
सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार विभागीय कार्यालयात ग्रुप डीच्या भर्तीसाठी आलेल्या उमेदवारांची नियमानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी व्हायला पाहिजे. वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्यातील तीन उमेदवार कोरोना बाधित असल्याचा अहवाल आल्याने पुन्हा खळबळ उडाली.

अद्याप गाईड लाईन नाही
कोरोना रॅपीड टेस्ट कीट संदर्भात गाईड लाईन आलेल्या नाहीत, असे मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक सुस्कर यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement