Published On : Sat, Jun 3rd, 2023

नागपुरात चोरीला गेलेल्या चिमुकल्याचा पोलिसांनी घेतला शोध

नागपूर : तहसील पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाईत करत जरीपटका परिसरात एका महिलेकडून चोरीला गेलेल्या अर्भकाची चोवीस तासांत सुटका केली. बाळ चोरणे आणि अपत्यहीन जोडप्यांना विकणे यात महिलेचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रेहाना वसीम अन्सारी यांचा चार महिन्यांचा मुलगा आवेश हा त्याची आई आणि तीन भावंडांसोबत मोमीनपुरा येथील फूटपाथवर झोपला होता. शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रेहानाला जाग आली आणि आवेश बेपत्ता झाल्याचे समजले. काही नातेवाईकांसह रेहानाने तहसील पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. माहिती मिळताच, वरिष्ठ पीआय विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत शहरात चिमुकल्याचा शोध सुरू केला.

Advertisement

संध्याकाळी,आवेश हा जरीपटका परिसरात महिलेसोबत सापडला. पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेऊन आवेशला त्याची आई रेहानाकडे सोपविले. पोलिस उपायुक्त मुम्माका सुदर्शन आणि गोरख भामरे यांच्या देखरेखीखाली संयुक्त पथकाने बाळाची सुटका केली. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement