मनपाच्या आरोग्य विभागाचे आवाहन
नागपूर : गोवर रुबेला या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार २७ नोव्हेंबरपासून नागपूर महानगरपालिकेमार्फत गोवर रुबेला लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील मनपाच्या शाळा, दवाखाने, शासकीय शाळा, खाजगी शाळा यामध्ये लसीकरण सुरू आहे.
वय वर्षे ९ महिने ते १५ वर्ष या वयोगटातील मुले आणि मुलींना ही लस देणे सुरू आहे. २६ डिसेंबर २०१८ पर्यंत चार लाख ३५ हजार ५९३ लाभार्थ्यांपैकी तीन लाख ६० हजार ९१५ लाभार्थ्यांना ही लस दिली गेली आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य अधिकारी (एम) डॉ.नरेंद्र बहिरवार, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.साजिद, एमआर लसीकरण नोडल अधिकारी डॉ.सुनील धुरडे, दीपाली नागरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी यांच्यासह दहाही झोनचे झोनल अधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे.
