Published On : Mon, Aug 26th, 2019

डेंग्यू रोगावर आळा घालणे आपल्याच हाती- डाके

Advertisement

कामठी :-कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 14 येथील यादव नगर स्थित मानसिंग यादव नामक इसमाचा डेंग्यूसदृश्य आजाराने तडकाफडकी मृत्यू झाला याची गंभीर दखल घेत मुख्याधिकारी रामकांत डाके यांनी त्वरित नगर परिषद सभागृहात आरोग्य विभाग तसेच स्वास्थ्य कर्मचाऱ्यांची तडकाफडकी सभा घेत स्वछता काम तसेच आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला याप्रसंगी डेंग्यू सारख्या रोगावर मात करणे हे आपल्याच हाती आहे तेव्हा सतर्कता बाळगून आपल्या घरातील स्वच्छता, परिसर स्वच्छता, वयक्तिक स्वच्छता,कोरडा दिवस पाळणे, आपल्या घरातील वापरायच्या पाण्याच्या भांड्यात एडिस डासांची अंडी होऊ नये , डेंग्यू असो वा हिवतापाचे डास असो हे निर्माण होण्याला आपण सर्व जवाबदार आहोत तरी आरोग्य कर्मचारी सह स्वास्थ्य कर्मचाऱ्यांनी डेंग्यू रोग नियंत्रणात आणण्यासाठो यावर घ्यावयाचे खबरदारी व काळजी यावर जनजागृती करोत नागरिकांना माहिती दिल्यास डेंग्यू सारख्या आजारावर आळा बसू शकतो असे मत कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सभेत व्यक्त केले.

याप्रसंगी नागरी प्रथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खणूनि, वैद्यकीय सल्लागार समिती चे सदस्य चंद्रकांत चौबे, स्वास्थ्य निरीक्षक विजय मेथीयां आदी उपस्थित होते.

पिण्याचे पाणी किंवा घरगुती वापरायचे पाणी असो महिलांचा पाण्यासोबत संबंध जास्त येतो. पावसाळ्यात उदभवणारे आजार डेंग्यू, हिवताप सारखे आजार हे मानव निर्मित आहेत . डेंग्यू चा डास हा विशेषतः वापराच्या शुद्ध पाण्यातच तयार होतो घरातील वापरायची भांडी धुवून पुसून आठवड्यातून एकदा कोरडी केल्यास डास उत्पत्ती होणार नाही तसेच घराभोवती फुटलेली डब्बे नारळाच्या करवाटी प्लास्टिक कप इत्यादी वस्तूची योग्य विल्हेवाट लावावे जेणे करून त्यात पाणी साचणार नाही त्यामुळे डेंग्यू आजारावर आळा बसेल .नगर परिषद च्या वतीने वस्ती वस्तीत आरोग्य पथक फिरत असून यांच्या सल्ल्यानुसार सूचनेचे पालन केल्यास आपले घरच नव्हे तर हे शहर डेंग्यू मुक्त होईल . असा विश्वास मुझयाधिकारि रामकांत।डाके यांनी व्यक्त केला.

संदीप कांबळे कामठी