कामठी : दुषित पाणी पुरवठा होत असल्या बाबत वारंवार तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्या मुळे प्रभाग १५ तील रामगढ आणि आंनदनगरात पोटाच्या विकाराचे रुग्ण वाढले असून येथील ७ रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल आहेत
येथे दूषित पाणी पुरवठा होत असून यावर तातडीने उपाय योजना करावी या बाबत नगरसेविका संध्या रायबोले यांनी न प मुख्याधिकारी रमाकांत डाके,पाणी पुरवठा विभाग चे अभियंता चौधरी यांना अनेकदा लेखी तक्रारी दिल्या, कार्यवाही करु असे मोघम उत्तर प्रत्येक वेळी देण्यात आले परंतु कार्यवाही करण्यात आली नाही
रामगढ आणि आंनदनगर येथील जयंती शाहु,रेखा पौणिकर, वैशाली मेश्राम, छाया कोल्हे,सावित्री लेंढारे,सत्यभामा वासनिक, बबिता पटले,विमल बघेल यांनी 2 महिन्यापूर्वी न प मध्ये दूषित पाणी येत असल्याची लेखी तक्रार केली असून अद्याप काहीही कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले.
पाणी पुरवठा करणारी पाइप लाइन लिकेज असल्याने दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती न प पाणी पुरवठा विभागाला असूनही उपाय योजना करण्यात येत नाही नागरिकांच्या जिविताशी न प प्रशासन खेळत आहे असा आरोप नगरसेविका संध्या रायबोले यांनी प्रतिनिधिशी बोलताना केला
संदीप कांबळे कामठी