Published On : Tue, Mar 20th, 2018

राजस्थानच्या सँड-स्टोन पासून न्यू-एयरपोर्ट मेट्रो स्टेशन’ची निर्मिती

Advertisement


नागपूर: नागपूर मेट्रोच्या सर्व स्टेशनला आगळी वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न नागपूर मेट्रो करीत आहे. सध्या नागपूर मेट्रोच्या वर्धा महामार्गाला लागून असलेल्या ग्रेड सेक्शन वरील तीनही मेट्रो स्टेशनचे कार्य जवळपास पूर्ण झाले आहे. विक्टोरिया कालीन डिझाइन असलेले खापरी मेट्रो स्टेशन, बुद्धिस्ट आर्किटेक्ट’वर आधारित न्यू- एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि आधुनिक आर्किटेक्ट’वर एयरपोर्ट(साऊथ) मेट्रो स्टेशन असे हे तीनही स्टेशन विविध संकल्पनेवर आधारित असून ते पूर्णपणे ऐतिहासिक ठरणार आहे.

दिल्लीचे जगप्रसिद्ध कुतुब मिनार आणि इंडिया गेट तसेच न्यू-एयरपोर्ट मेट्रो स्टेशन’मध्ये विलक्षण साम्य असून या सर्व वास्तूंच्या उभारणीत सँड-स्टोन’ची महत्वाची भूमिका आहे. न्यू-एयरपोर्ट मेट्रो स्टेशनची क्रिम(Cream) रंगाच्या सँड-स्टोन’ने सजावट करून ते आणखी आकर्षक बनविण्यात आले आहे.

न्यू- एयरपोर्ट मेट्रो स्टेशन’वर वापरण्यात आलेले सँड-स्टोन राजस्थानच्या धोलपूर येथून आणण्यात आले आहे. राजस्थान वरून नागपुरात हे सँड-स्टोन आणण्याचे कार्य फार कठीण असले तरी ते कुशल वाहन चालकाच्या मदतीने पूर्ण करण्यात आले. कारण वाहतुकीत येणारे अडथळे हे सँड-स्टोन’साठी हानिकारक असतात. यासाठी योग्य त्या बाबींची काळजीपूर्वक दखल घेत राजस्थान येथून हे सँड-स्टोन आणत असताना प्रथम त्याठिकाणी सँड-स्टोन’ला आवश्यक असे स्टोन’चे सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले होते.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


साधारणपणे २ दिवसाचा नागपूर ते धोलपूर दरम्यानचा हा प्रवास असला तरीही हे सँड-स्टोन संत्रानगरीत आणण्याकरता ४ दिवसाचा अवधी लागला. कोरड्या आच्छादन तंत्राचा (Dry Cladding Tecknology)वापर करून न्यू- एयरपोर्ट मेट्रो स्टेशन’वर हे सँड-स्टोन बसविण्यात आले आहे. अशी माहिती या भागातील मुख्य प्रकल्प व्यवस्थापक एच.पी. त्रिपाठी यांनी दिली. सँड-स्टोन आणि इतर स्टोन मध्ये नसर्गिक रंगाचा प्रमुख फरक जाणवतो. इतर स्टोन’ला मानवनिर्मित रंगाने आकर्षक बनविण्यात येत असून सँड-स्टोन’ला नैसर्गिक रंग प्राप्त असतो. अशीही माहिती एच.पी. त्रिपाठी यांनी दिली. तर खापरी मेट्रो स्टेशनवर सुद्धासँड-स्टोन’चा वापर झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्टेशन चे आधुनिक निर्माण करत असताना अगदी बारकाईने सँड-स्टोन’चा वापर करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षपासून सँड-स्टोन पासून बांधकाम करण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुकेश कुमरे या कारागिरांनी संबंधित कार्याची माहिती दिली. तर या कामासाठी लागणारी पारंगत कला एका पिढीतून दुसऱ्या पिढी पर्यंत आम्ही पोहोचवीत असल्याचे महेंद्र सिंग या कारागिरांनी सांगितले.

तेव्हा लवकरच या मेट्रो स्टेशनचे कार्य पूर्ण होणार असून एक आकर्षक स्टेशन नागपूरकरांना पाहायला मिळणार आहेच. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा न्यू- एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आकर्षक ठरणार आहे.

Advertisement
Advertisement