Published On : Sun, Jul 1st, 2018

सिमेंट रोडचा बांधकामुळे आणखी किती निर्दोष लोकांचा बळी, अपगत्व

कन्हान : – शहरातील अत्यंत महत्वाचा मुख्य मार्ग असलेला नागपुर जबलपूर महामार्ग क्र ४४ च्या ऑटोमोटिव्ह चौक नागपुर ते टेकाडी चारपदरी सिमेंट रस्त्याचे बांधकाम मागील कित्येक महिन्या पासुन केसीसी बिल्डकॉन कंपनी व्दारे बेवारस व बेजवाबदारी पणे बांधकाम सुरू आहे .यामुळे या रस्त्याने प्रवासी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असुन या बेवारस बेजवाबदारीपणे बांधकामुळे आणखी किती निर्दोष लोकांना अपघातात बळी, अपगत्व स्विकारावे लागेल.

गांधी चौक येथील गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती पिण्याचा पाण्याचा नळ सोडणारा वाल खड्डा जिवघेणा बिना झाकण उघडा पडलेला आहे. दररोज यासंदर्भात अनेकदा नगरपरिषद चे अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक यांना सुचना दिली असता त्यांचेही या मुलभूत समस्येकडे असम्य दुर्लक्ष असल्यामुळे या परिसरात प्रचंड अपघाताची स्थिती वाढली आहे.

गांधी चौक हे रहदारीचे मुख्य ठिकाण असल्याने येथे लगतच पोलीस स्टेशनचे कार्यालय, मुलांची नावाजलेली बीकेसी पी इग्रजी शाळा व पं नेहरू कन्या विद्यालय , इंदिरा गांधी जुनियर कॉलेज आदी सर्वांकरीता येणारा जाणारा मुख्य चौरस्ता आहे आतापर्यंत येथे लहान, मोठे किरकोळ अपघात झालेले आहे शाळेकरी मुलांना, सायकल , दुचाकी वाहन चालंकाना आतापर्यंत ह्या जिवघेणा खड्डामुळे माणसीक व शाररीक दुखापती, त्रास, मनस्थाप सहन करावा लागत आहे.

व अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत तसेच केसीसी बिल्डकॉन कंपनीच्या बेवारस , निकृष्ठ रोड बांधकामामुळे व सिमेंट रस्त्यावरील माती, सोडलेले खड्डेपावसाच्या पाण्यानी भरून राहतात परीसरातील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अपघातास बळी पडावे लागते. तसेच गांधी चौकातील पिण्याच्या पाण्याचा नळ सोडणारा व्हॉल्व चा खड्डा रात्री ला दिसून येत नसल्याने अपघात होतात. यासंदर्भात अनेकदा येथील नगरपरीषद कार्यालयात तोंडी तक्रार केली. परंतू आजपर्यंत काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. कुठलाही दखल सुद्धा घेण्यात आली नाही.

सबंधीत परीसरात दिवसा व रात्री दरम्यान जिवितहानीचा धोका निर्माण झाला आहे.याकडे स्थानिक नगरपरीषद अधिकारी कर्मचारी, नगरसेवक अशा ज्वलंत समस्याचा दुर्लक्षित पणामुळे कदाचित अनुचित घातपाताचा जिवहानीचा प्रकारही घडु शकतो, जर येता काही दिवसांत ह्या जिवघेण्या घरगुती नळ सोडणारा वाल खड्डाला झाकण नाही लावण्यात आले तर होणाऱ्या घटनेला सर्वस्वी जवाबदारी कन्हान नगरपरिषदेच्या सर्व अधिकाऱ्यां वर राहील व केसीसी बिल्डकॉन कंपनी वर सुध्दा राहील.

तसेच तात्काळ गांधी चौक कन्हान येथे चक्काजाम ,धरणे आंदोलन उभारण्यात येईल असा तीव्र संतापजनक इशारा युवा समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार , अकरम कुरैशी, गंगाधर ढोमणे, अनिल मेश्राम, दिपक तिवाडे, अरविंद देशमुख, प्रदिप गायकवाड, मनोज बोरघरे, साबीर शेख, विनोद मसार, वृषभ बावनकर, मनोहर तिवाडे, विनोद भनारकर, अक्षय फुले, शुभम मांदुरकर,समस्त कन्हान पिपरी शहरवासीयांनी दिला आहे.