Published On : Wed, Mar 28th, 2018

बांधकामांना मंजुरी शासकीय नियमानुसारच – लहुकुमार बेहते

Advertisement


नागपूर: अग्निशमन विभागाद्वारे देण्यात येणारी बांधकाम मंजुरी शासकीय नियमानुसारच देण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अग्निशमन आणि विद्युत समिती सभापती लहुकुमार बेहते यांनी दिली. बुधवार (ता.२८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित समितीच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपसभापती वर्षा ठाकरे, समिती सदस्य निशांत गांधी, अनिल गेंडरे, सदस्या वनिता दांडेकर, आशा नेहरू उईके, ममता सहारे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उप अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना लहुकुमार बेहते म्हणाले, अग्निशमन विभागाद्वारे बांधकामांना मंजुरी देण्यात येतात, त्या मंजुरीचे दर वाढविण्यासाठी प्रशासनाद्वारे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यावर बोलताना, शासकीय नियमानुसारच मंजुरी आणि मंजुरीचे दर वाढविण्यात यावे, असे निर्देश सभापती लहुकुमार बेहते यांनी दिले.

त्रिमूर्ती नगर येथे नव्याने तयार करण्यात येणाऱ्या स्थानकाचा आढावा यावेळी घेण्यात आला. तेथील काम पूर्ण झाले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी दिली. तेथे असलेल्या विद्युत मंडाळासोबत डी.पी. संदर्भात चर्चा करण्यात आली. मागील दीड वर्षापासून विद्युत मंडाळाशी चर्चा करण्यात येत आहे. विद्युत मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची शहानिशा मनपाच्या विद्युत विभागाद्वारे करण्यात यावी, असे निर्देश लहुकुमार बेहते यांनी दिले. हा विषय गांभीर्याने हातळण्यात यावा, असेही ते म्हणाले.

बैठकीला अग्निशमन विभागाचे सर्व स्थानक अधिकारी, विद्युत विभागाचे सहायक अभियंता ए.एस.मानकर, सलीम इकबाल, उपअभिंयता (प्रकल्प)शकील नियाजी, धनजंय मेडूलकर उपस्थित होते.

लकडगंज आणि वाठोडा येथे नव्याने तयार करण्यात येणाऱ्या अग्निशमन स्थानकाची माहिती कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी दिली. वाठोडा स्थानकाजवळ रहिवासी गाळे तयार करण्यासंदर्भातदेखील माहिती त्यांनी दिली.