संविधान प्रास्ताविका पार्क उदघाटित

नागपुर – आज संविधान दिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय परिसरात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’ चे माजी ऊर्जामंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्रभारी कुलगुरू मा. डॉ. विनायक देशपांडे, मा. आमदार श्री. विकास ठाकरे, मा. आमदार श्री. अनिल सोले, माजी मंत्री मा. श्री. राजकुमार बडोले, मा. श्रीमती शीतल तेली-उगले, मा. डॉ. गिरीश गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.