Published On : Sat, Jul 3rd, 2021

संविधान चौकात तेली समाजाचे लाक्षणिक उपोषण

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व राज्यस्तरीय समाज संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष खासदार रामदास तडस व राज्य महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर 2 जुलै रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. नागपुरात संविधान चौक येथे उपोषण मंडपात यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सुप्रीम कोर्टाने 28 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी बाबत”ओबीसींचे “महाराष्ट्रतील आरक्षण रद्द ठरविल्याने ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय झालेला आहे. या निर्णयाचे भविष्यात ओबीसींचे सर्व क्षेत्रातील आरक्षणावर गंभीर परिणाम होणार आहेत.

त्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द चा आदेश रद्द करावा. राज्य सरकार द्वारा ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा कायदा समान करावा. तसेच मंडल आयोग लागू करावा. या मागण्यांसाठी आज 2 जुलै रोजी संविधान चौक नागपूर येथे जिल्ह्याच्या वतीने प्रातिनिधिक संख्यांचे लाक्षणिक उपोषण काळा मास्क, काळी फीत लावून उपोषण करण्यात आले.

यावेळी ओबीसी तेली समाजातर्फे प्रांतिक सचिव व विदर्भ प्रभारी बळवंतराव मोरघडे यांचे नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. उपोषण मंडपात राज्य सहसचिव बलवंत मोरघडे सह आमदार टेकचंद सावरकर, ईश्वर बालबुध, शेखर सावरबांधे, रमेश गिरडे, महिला आघाडी अध्यक्षा नयनाताई झाडे, युवा आघाडी अध्यक्षा प्रशांत ईखार व उपाध्यक्ष निखिल भुते, अरुण धांडे, रमेश उमाटे, कुणाल पडोळे, संकेत बावनकुळे, प्रभाकर खंडाईत, देवमन कामडी, सुभाष घाटे, चंद्राभान मेहर, वंदना वनकर, लता बेलघरे, मीना लेंडे, भारती मोहिते, अभय रेवतकार, रमेश कोसुरकर, मंगलाताई कारेमोरे, वर्षा बारई, मंगलाताई गवरे, शोभाताई कारमोरे, वंदना वाडीभस्मे आदींची उपस्थिती होती.