Published On : Wed, Jul 17th, 2019

लोकसंख्या नियंत्रणासाठी आयोगाचे गठन करा

Advertisement

खा. डॉ. विकास महात्मेंनी राज्यसभेत उचलला मुद्दा

नागपूर: वाढत्या लोकसंख्येला राष्ट्रीय आणीबानी समजून यावर नियंत्रणासाठी युद्धपातळीवर कार्य करणे गरजेचे आहे. याकरिता एका आयोगाची स्थापना करण्याची मागणी राज्यसभेत खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मेने शून्य तासात केली. डॉ. महात्मे म्हणाले की, आम्ही आपल्या लोकसंख्येचा विचार केला तर दोन प्रकारच्या विचारधारा प्रकर्शात येतात. एका विचारधारेनुसार, सर्वात मोठा मनुष्यबळ भारताजवळ असून ते आपल्यासाठी मोठे यश आहे.

कारण, मनुष्यबळ काम करेल तर देश पुढे जाणार. दुसऱ्या विचारधारेला माझी स्वत:ची सहमती असून वाढती लोकसंख्येला विस्फोटक मानल्या जाते. कारण हे कधीही फूटून नुकसार करू शकतात. आमची संसाधने, नोकरीची संधी, गरजा आणि लोकसंख्या यामध्ये संतुलन नाही. नेहमीच पाहण्यात येते की, गरीब किंवा आर्थिक स्वरुपात कमजोर परिवारांच्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

जेव्हाकी त्यांच्याकडे मुलांचे पालन, शिक्षणासाठी संसाधन राहत नाही. म्हणूनच कुपोषणाचे स्तर वाढले आहे. दुसरीकडे शिक्षित परिवार आहेत ज्यांच्याकडे संसाधन असून मुले नेहमीच एक किंवा दोन असतात. यात सामाजिक विषमता वाढत आहे, असेही ते म्हणाले. प्रत्येक 3 महिन्यात आम्ही एक इजराईल, आणि प्रत्येक 6 महिन्यात एक स्विट्जरलंड तसेच एक वर्षांत ऑस्ट्रेलिया सारखे देश बनत आहोत असेही ते म्हणाले.