Published On : Thu, Oct 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मतदारांच्या हक्कांसाठी काँग्रेस रस्त्यावर; ‘व्होट बचाव, देश बचाव’ अंतर्गत बाईक रॅली

Advertisement

नागपुरात मतदारांच्या हक्कांसाठी काँग्रेस रस्त्यावर; ‘व्होट बचाव, देश बचाव’ अंतर्गत बाईक रॅलीनागपूर : ‘व्होट बचाव, देश बचाव’ या अभियानांतर्गत काँग्रेसकडून नागपुरात बाईक रॅली काढण्यात आली. एसआयआर प्रक्रियेमुळे मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला. या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसने मतदारांच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित केला.

रामेश्वरी येथील त्रिशरण चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर दत्तात्रय नगर येथील महाकाळकर सभागृहापर्यंत रॅली काढण्यात आली. काँग्रेसच्या ‘व्होट बचाव, देश बचाव’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात नागपुरातून करण्यात आली.

या रॅलीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सिरीवेल्ला प्रसाद, नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल गुडधे पाटील आणि आमदार अभिजित वंजारी सहभागी झाले होते. याशिवाय काँग्रेसच्या विविध ब्लॉक कमिटींचे सदस्य, नगरसेवक तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या नावांबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेबाबत आपला विरोध व्यक्त करण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. यावेळी प्रदेश प्रभारी सिरीवेल्ला प्रसाद आणि शहराध्यक्ष प्रफुल गुडधे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.