Published On : Fri, Mar 23rd, 2018

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभावती ओझा यांचे निधन

Advertisement

नागपूर : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष प्रभावती ओझा यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता ‘प्रभा सदन’ १७, गिरीपेठ येथील निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघून अंबाझरी घाट येथे अत्यसंस्कार होतील.
ओझा या गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांना उपचारार्थ वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा काँग्रेसचे प्रदेश सचिव रामकिशन ओझा, मुलगी लता शर्मा, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement