Published On : Sun, Mar 28th, 2021

काँग्रेसने कट रचून कमी केले, ओबीसी आरक्षण

Advertisement

आमदार डॉ. परिणय फुके यांचा गंभीर आरोप

४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. खानविलकर साहेब यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार राज्यात २७ टक्के ओबीसी आरक्षण संपविण्यात आले. याबाबतची मागणी कुणी केली तर ही याचिका कांग्रेस प्रदेशअध्यक्ष श्री नाना पटोले यांच्या मतदार संघातील कांग्रेस पक्षाचे जिला परिषद सदस्य व भंडारा जिला परिषद चे माजी अध्यक्ष श्री रमेश डोंगरे यांनी केली होती, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.

Advertisement

डॉ. फूके यांनी म्हटले आहे की, एकीकडे ओबीसी च्या नावाखाली मते घ्यायची, मोठे मोठे मोर्चे काढायचे, आंदोलने करायची आणि लोकांना सांगायचे की ओबीसी आरक्षण कमी होऊ देणार नाही आणि दुसरीकडे मात्र ओबीसी समाजाच्या विरोधात षडयंत्र रचून ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही. हा काँग्रेस पक्षाचा दोंगीपणा आहे.

ओबीसी मंत्रालय काँग्रेस कडे असूनही सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारला याबाबत योग्य भूमिका मांडता आली नाही. त्यावेळी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपले तोंड का उघडत नाही. काँग्रेस नेत्यांनीच ओबीसी आरक्षण संपविण्यासाठी याचिका दाखल केली असेल तर हे काँग्रेस नेते बोलणार तरी कसे? असा सवालही डॉ. फूके यांनी विचारला आहे.
न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही महविकास आघाडी सरकार ओबीसी साठी आयोग स्थापन करीत नाही.

ओबीसी बांधवांना आरक्षण मिळावे असे या सरकारलाच वाटत नाही ही वस्तुस्थिती असून यानिमित्ताने काँग्रेस नेत्यांचा ढोंगीपणा जनतेसमोर आला आहे. ओबीसी समाज काँग्रेसला आणि या महाविकास आघाडी सरकारला कधीच माफ करणार नाही, असा इशारा डॉ. परिणय फुके यांनी दिला आहे

रवि आर्य

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement