Published On : Sat, Jun 26th, 2021

वाडीत ओबीसी आरक्षण व जनसमस्या विराधात कांग्रेस निदर्शनाने वेधले लक्ष

– मोदी-भाजप सरकार मुळे जनता त्रस्त!-,युवक काँग्रेस.

वाडी – देशातील भाजप व मोदी सरकरच्या मनमानी व एकतर्फी कारभारा सह तीव्र गती ने वाढत चाललेली महागाईने देशातील जनता त्रस्त झाली असून 52 टक्के ओबीसी समाजाची आरक्षण व जनगणेसारखे प्रश्नन दुर्लक्षित करीत असल्याने प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे ,या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस च्या पुढाकाराने अ. भा. काँग्रेस समिती च्या सदस्या कुंदा राऊत यांच्या नेतृत्वात दाभा वळणावर पक्षाचे झेंडे,व निषेध फलक घेऊन तीव्र नारे निदर्शने करण्यात आली.

अरे दिल्लीचा पोपट काय म्हणतो ,ओबसी आरक्षण नाही म्हणतो, ओबसी आरक्षण संपवणाऱ्या मोदी सरकारच्या निषेध असो,आरक्षण मिळालेच पाहिजे,महागाई वाढविणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो असे हातात फलक व जोरदार घोषणा देण्यात आल्या.

हे जनआंदोलन हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष अश्विन बैस व काँग्रेस तालुका प्रमुख प्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात प्रवीण सिंग,भिमराव लोखंडे,भिमराव कांबळे,योगेश कुमकुमवार,विनोद लांगोटे,किशोर नागपूरकर,पांडुरंग बोरकर,आशिष पाटील,अशोक गडलींगे,ईशान जंगले,गणेश बावणे,पंकज फलके,गोकुळ जुमणाके, नीकेश भागवतकर,रोहन नागपूरकर,अमोल केदार,अविनाश बारंगे,अभिनव वड्डेवर,सुदर्शन ठिस्के,दिपेश वर्मा,सुरेश उके,शुभम पिंपदशेंडे व समस्त युवक कांग्रेस चे पदाधिकारी सहभागी झाले होते.