मुंबई : भारतीय सैन्यदलाने नुकत्याच केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधील कारवाईचे काँग्रेस पक्षाने मोठ्या अभिमानाने कौतुक केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, “भारतीय सैन्याचा अभिमान आहे. जय हिंद!”
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेड़ा यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले, जो भारताच्या नागरिकांना धमकवेल, तो वाचणार नाही. आपल्या सैन्याने हे पुन्हा सिद्ध केलं आहे.
राष्ट्रीय एकता सर्वांत महत्त्वाची-खरगे यांचा संदेश
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्टपणे सांगितले की काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाविरुद्ध सरकार आणि सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यांनी एक्स (पूर्वी ट्विटर) वर लिहिलं, “पाहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून आम्ही सरकारच्या आणि सैन्याच्या निर्णायक कारवायांना पाठिंबा देत आहोत. राष्ट्रहित हेच आमचं सर्वोच्च ध्येय आहे.”
दहशतवादी तळांवर अचूक हल्ले-
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील (PoJK) अनेक दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. यात जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन या संघटनांचे महत्त्वाचे कॅम्प्स लक्ष्य करण्यात आले. जैशचा मुख्य केंद्र सैयदना बिलाल मस्जिद, मुजफ्फराबादमधील रेड फोर्टसमोर आहे, जिथे सुमारे ५०-१०० दहशतवादी लपलेले होते.
शवाई नल्लाह आणि मास्कर रहील शाहिद-
लष्कर-ए-तैयबाचा शवाई नल्लाह कॅम्प २००० पासून सक्रिय होता आणि तेथे दहशतवाद्यांची भरती व प्रशिक्षण दिलं जात होतं. हिज्बुलचा मास्कर रहील शाहिद कॅम्प कोटली जिल्ह्यात असून, हा एक जुना आणि गुप्त तळ आहे, जिथून दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे व रणनीतिक मदत दिली जायची.
सिंदूर ऑपरेशनचा भावनिक पैलू-
पाहलगाम हल्ल्यात शहीद झालेले संतोष जगदाळे यांच्या मुलीने, असावरी जगदाळे हिने म्हटले, “ऑपरेशनचं नाव ‘सिंदूर’ ऐकून मी भावूक झाले. हे त्या वीर पत्नींना समर्पित आहे ज्यांनी आपल्या पतीला गमावलं. हे केवळ सूड नाही, तर शहीदांसाठी न्याय आहे.