Published On : Sat, Jan 25th, 2020

‘सीएए’ समर्थनार्थ देवेंद्र फडणवीसांच्या व्याख्यानाला काँग्रेसचा विरोध

नागपूर : सुधारित नागरिकत्व कायदा अर्थात ‘सीएए’च्या समर्थनार्थ माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं व्याख्यान वादात सापडलं (Congress Opposes Fadnavis Speech) आहे. काँग्रेस नेत्याने आक्षेप घेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र पाठवलं आहे.

व्याख्यानाच्या स्थळावरुन काँग्रेसने या कार्यक्रमाला आक्षेप घेतला आहे. व्याख्यानाचा कार्यक्रम धरमपेठ शिक्षण संस्थेच्या परिसरात आज (शनिवारी) संध्याकाळी आयोजित करण्यात आला आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेले कार्यक्रम शाळा किंवा शैक्षणिक परिसरात घेऊ नयेत, असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. याच आदेशाचा आधार घेत काँग्रेस महासचिव संदेश सिंगलकर यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं पत्रात म्हटलं आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यांना समर्थन करणाऱ्या या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी सिंगलकर यांनी पत्रातून केली आहे. शासकीय आदेश झुगारणाऱ्या धरमपेठ शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे.

याविषयीची तक्रार शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, शिक्षण मंत्री आणि राज्य सरकार यांच्याकडे करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement