Published On : Mon, Dec 30th, 2019

ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार : काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची अधिकृत यादी

मुंबई : महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या काँग्रेस आमदारांची अधिकृत यादी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार यांच्यासह 10 नेते मंत्रिपदाची शपथ (Congress Ministers List) घेणार आहेत.

अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर सतेज पाटील आणि डॉ. विश्वजीत कदम हे राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

आतापर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर नाना पटोले यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्षपदाची माळ पडली आहे.


काँग्रेसमधून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी (Congress Ministers List)

अशोक चव्हाण (कॅबिनेट मंत्री)
के सी पाडवी (कॅबिनेट मंत्री)
विजय वडेट्टीवार (कॅबिनेट मंत्री)
अमित देशमुख (कॅबिनेट मंत्री)
सुनिल केदार (कॅबिनेट मंत्री)
यशोमती ठाकूर (कॅबिनेट मंत्री)
वर्षा गायकवाड (कॅबिनेट मंत्री)
अस्लम शेख (कॅबिनेट मंत्री)


सतेज पाटील (राज्यमंत्री)
डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री)

या नेत्यांचा समावेश नाही

पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे या आमदारांचा मंत्रिमंडळाच्या यादीत समावेश नाही. पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, शपथविधीसाठी शरद पवारांचा आमदारांना फोन