Published On : Fri, May 27th, 2022

काँग्रेसचा नवसंकल्प व ऐक्य मेळावा

Advertisement

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवसंकल्प शिबीर नुकतेच राजस्थानच्या उदयपूर येथे झाले. या पार्श्वभुमीवर शिबीरातील घोषणांच्या अंमलबजावणीसाठी प्रदेश काँग्रेसने कार्यकारिणीची बैठक घेतली. सद्यपरिस्थितीत विरोधकांच्या सततच्या अपप्रचारामुळे व बोचऱ्या टिकेमुळे तसेच भयभित वातावरण निर्मीतीमुळे कॉंग्रेस पक्षामध्ये थोडी उदासिनता दिसत आहे. ती दूर होण्यासाठी व त्याद्वारे कार्यकर्ता आणि त्या अनुषंगाने पक्षामध्ये उत्साहवर्धक वातावरण निर्मीतीसाठी लोकनेते मा. श्री. रणजीतबाबू देशमुख, माजी मंत्री (म.रा.) व माजी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी यांच्या अमृत महोत्सवानिमित्य विदर्भातील नेते व कार्यकर्त्यांचा नवसंकल्प व ऐक्य मेळावा येत्या रविवारी २९ मे २०२२ रोजी सायं. ६.०० वा. कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे आयोजित केला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री मा.श्री. पृथ्वीराजजी चव्हाण राहतील. राजस्थानचे मुख्यमंत्री मा. श्री. अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. दिग्विजय सिंग हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

Advertisement

लोकनेते मा. रणजीतबाबू देशमुख यांनी २९ मे २०२१ रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. कोरोनाच्या संकटामुळे आयोजन समितीला कुठलाही कार्यक्रम घेता आला नाही.

आता सर्व निर्बंध शिथील झाल्यामुळे कार्यकर्ते, समर्थक आणि चाहत्यांच्या आग्रहा खातीर हा मेळावा आयोजित करण्यात आला. या निमित्य कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य आणने, उत्साह वाढविणे आणि सर्वांनी एकत्र यावे या उद्देशाने हा कार्यक्रम होत आहे.

कोरोना संकटाची २ वर्ष आणि त्यापूर्वीही उपराजधानी नागपूरमध्ये पक्षाचा जाहिर मोठा कार्यक्रम झाला नाही. पक्षासमोरील आव्हाने, आगामी वाटचाल, येणाऱ्या काळातील निवडणुकांच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे म्हणून हा प्रयत्न होत आहे.

पक्षाचा इतिहास बघितला असता मा. रणजीतबाबू देशमुख जेव्हा जेव्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले, तेव्हा तेव्हा विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस पक्षाने घवघवीत यश संपादन केले. प्रत्यक्षात मा. श्री. रणजीतबाबूंनी या सत्काराला नम्रपणे नकार दिला होता, मात्र त्यांना यामागील उद्देश सांगितला असता त्यांनी सत्कार स्विकारण्यास सहमती दर्शविली. मेळाव्यात नागपूर विदर्भच नव्हे तर राज्याच्या विविध भागातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रणजीतबाबूंचे चाहते उपस्थित राहणार आहे.

यामध्ये मा. श्री. मुकुल वासनिक- महासचिव, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी, मा. श्री. अविनाश पांडे महासचिव, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी, मा. श्री. एच. के. पाटील – – प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मा. श्री. नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मा. श्री. आशिष दुआ राष्ट्रीय सचिव व प्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, 1 मा. ना. श्री. बाळासाहेब थोरात महसुल मंत्री (म.रा.), मा.ना.श्री. दिलीप वळसे पाटील – गृह मंत्री (म.रा.), मा.ना.श्री. नितीन राऊत उर्जा मंत्री (म.रा.), मा.ना. श्री. विजय वडेट्टिवार – बहुजन कल्याण मंत्री (म.रा.), मा. ना. श्रीमती यशोमती ठाकूर महिला व बालकल्याण मंत्री (म.रा.), मा.ना.श्री. अमित देशमुख वैद्यकीय शिक्षण मंत्री (म.रा.), मा. श्री. शत्रुघ्न सिन्हा . – खासदार व माजी केंद्रीय मंत्री (भारत सरकार), मा. श्री. प्रफुल्ल पटेल खासदार व माजी केंद्रीय मंत्री (भारत सरकार), मा. श्री. विलास मुत्तेमवार- माजी केंद्रीय मंत्री (भारत सरकार), मा. श्री. कृपाल तुमाने खासदार, मा. श्री. सुरेश (बाळु ) धानोरकर खासदार, आमदार मा. श्री. – वजाहत मिर्झा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड, मा. श्री. विकास ठाकरे आमदार तथा शहराध्यक्ष नागपूर शहर कॉंग्रेस कमिटी, मा. श्रीमती संध्या सव्वालाखे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटी, मा. श्री. राजेंद्र मुळक जिल्हाध्यक्ष नागपूर जिल्हा (ग्रामिण) कॉंग्रेस कमिटी, मा. श्री. कुणाल राऊत- अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.

कृपया आपण सर्वानी अमृत महोत्सव सत्कार सोहळ्यास आवर्जुन उपस्थित राहावे हे आग्रहाचे निमंत्रण.

पत्र परिषदेला प्रकाश मुगदीया, आर. एम. खान, विलास भालेराव, राजू भागवत, शाबाद खान, ए. के. पांडे, प्रा. डॉ. विजय धोटे उपस्थित होते.

धन्यवाद.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement