Published On : Tue, Dec 5th, 2017

राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्षपदासाठी खा. राहुल गांधी यांचे नामनिर्देशन पत्र दाखल


मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लपल्ली रामचंद्रन यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, खा. रजनीताई पाटील, खा. हुसेन दलवाई यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे सूचक म्हणून राज्यातील विविध नेत्यांनी स्वाक्षरी केलेले प्रस्ताव इतर राज्यांतर्फे आलेल्या प्रस्तावासोबत खा. राहुल गांधी यांच्या नामनिर्देशन पत्राला जोडण्यात आले. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.