Published On : Mon, Nov 4th, 2019

लोकशाहीसाठी काँग्रेसची गरज.प्रा. वसंत पुरके

नागपूर: कॉंग्रेसला जिंकायचे असेल तर नाराज लोकांना परत पक्षात आणणे गरजेचे आहे. खर्या लोकशाहीसाठी कॉंग्रेसची गरज आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके (राळेगाव) यांनी केले. सत्ताधार्यांच्या विरोधात कडवी लढत देणार्या विदर्भातील काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपाई आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांचा स्नेहमिलन आणि सत्कार कार्यक्रम त्रिमूर्ती नगर येथील अनुसया मंगल कार्यालयात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबरदस्त आव्हान देणारे काँग्रेसचे डॉ. आशिष देशमुख (माजी आमदार) यांनी हा भव्य कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता.

प्रास्ताविक डॉ. आशिष देशमुख यांनी केले. ते म्हणाले, कॉंग्रेस हा महात्मा गांधींच्या विचारसरणीचा मोठा पक्ष आहे. महात्मा गांधी व कॉंग्रेसचे विचार लोकांपर्यंत पोहोचवू. या विधानसभा निवडणुकीत भाजपचा अहंकार जनतेने दूर केला. प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या भरघोस मतांमुळे कॉंग्रेस आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. काही मोठे नेते विदर्भात प्रचारासाठी आले असते तर विजय निश्चित होता. भविष्यात याच उमेदवारांना तिकीट मिळावे, ही अपेक्षा. विदर्भात कॉंग्रेसला मजबूत करण्यासाठी पक्षाने विदर्भाची विभागीय कॉंग्रेस कमिटी गठीत करावी. सध्याची राजकीय परिस्थिती बघता महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नाही.

कार्यकत्र्यांनी निराश न होता कामाला लागावे व भाजपचे पितळ उघडे पाडावे. पुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आघाडीचा विजय निश्चित आहे, असे देशमुख म्हणाले. कार्यकत्र्यांचे आभार ज्ञानेश्वर पाटील (खामगाव), डॉ. स्वाती वाकेकर (जळगाव जामोद), डॉ. चंदा कोडवते (गडचिरोली), सतीश वारजुरकर (चिमूर), विजय घोडमारे (हिंगणा), बंटी शेळके (मध्य नागपूर), महेश मेंढे (चंद्रपूर), विश्वास झाडे (बल्लारपूर), अमर वर््हाडे (गोंदिया), प्रा. संजय बोडखे (आकोट), डॉ. रजनी राठोड (वाशीम), शेखर शेंडे (वर्धा), जयदीप कवाडे (भंडारा) व इतर उमेदवारांचा यावेळी शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर माजी मंत्री श्री. रणजीतबाबू देशमुख, विनोद गुडधे पाटील, अनंतराव घारड, मुकुंदराव पन्नासे, अ‍ॅड. रेखा बाराहाते, हर्षला साबळे, दिलीप पनकुले, राकेश पन्नासे व इतर मान्यवर हजर होते. विनोद गुडधे पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.