“मागील ५ वर्षात नागपूरच्या एमआयडीसी, मिहान, सेझमध्ये व विदर्भात एकही नवीन कारखाना आला नाही. मिहानची सुरुवात कॉंग्रेसने केली. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेलोकांचा असलेला रोजगार हिरावल्या गेला आहे. सिमेंट रस्ते व मेट्रो काय कामाची? देवेंद्र फडणवीस यांना २०१९ ची निवडणूक सोपी नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यावर मी बेमुदत उपोषणाला बसलो असतांना आठव्या दिवशी माझे उपोषण श्री. नितीन गडकरी व श्री. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा सत्तेवर आल्यास विदर्भ राज्य निर्माण करू, असे आश्वासन देऊन संपविले होते.
विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे श्री. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. ते विदर्भद्रोही आहेत. आज सर्वांनी एकजुटीने, संघटीत होऊन लढा देण्याची गरज असून हीनिवडणूक जिंकणे कठीण नाही. विश्वासपूर्ण काम करा, आपला विजय नक्की आहे”, असे मार्गदर्शन माजी आमदार व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे युवा नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केले.
दि. ०६.१०.२०१९ ला वर्धा रोड नागपूरवरील राजीव नगर येथे कॉंग्रेसतर्फे आयोजित कार्यकर्त्यांसाठी अद्भुत प्रशिक्षण मेळावा व कार्यशाळेत ते बोलत होते. डॉ. आशिष देशमुख यांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस-रिपाई(कवाडे गट)चे अधिकृत उमेदवार’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
“डॉ. आशिष देशमुख यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. ते कॉंग्रेसच्या विचारधारेशी जुळलेले आहेत. त्यांच्या सारख्या तडफदार नेतृत्वाची आज गरज असून ते ही निवडणूक नक्की जिंकतील. कार्यकर्त्यांनी जोमाने कार्य करावे”, असे कॉंग्रेस कमेटीचे महासचिव श्री. मुकुल वासनिक यांनी वक्तव्य केले. श्री. किशोर गजभिये यांनी बूथ प्रमुखांना मार्गदर्शन केले आणि बूथ प्रमुखांचे प्रशिक्षण ९ ऑक्टोबर २०१९ ला खामला येथील कॉंग्रेसच्या कार्यालयात घेण्यात येईल, असे सांगितले.
कॉंग्रेसचे महासचिव श्री. मुकुल वासनिक, माजी खासदार श्री. विलास मुत्तेमवार, श्री. विकास ठाकरे, श्री. बबनराव तायवाडे, श्री. आशिष दुवा, श्री. प्रफुल्ल गुडधे, श्री. जोगेंद्र कवाडे, श्री. किशोर गजभिये, श्री. दिलीप पनकुले,डॉ. आयुशरी देशमुख, श्री. अह्मद कदर व हजारो कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.









