Published On : Fri, Jan 17th, 2020

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दबदबा.

कन्हान : – जिल्हा परिषदेच्या निवडणु कित तीन जागांवर कांग्रेस, शिवसेना एक व भाजपा लाही एक जागा पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला पाच ,शिवसेनेला चार व भाजपा एका जागी विजय झाली.

दिनांक ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०१९ राम टेक करिता स्व. घनश्यामराव किंमतकर सांस्कृतिक सभागृह येथे शांतातापूर्ण वातावरणात मतमोजणी पार पडली. रामटेक येथे ऐकून ५ गट व १० गण निहाय मतमोजणी झाली. यात १४ मत मोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक फेरी, गण निहाय पद्धतीने करण्यात आली.काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्या शांताताई जोंधुजी कुंभरे हया तिसऱ्यांदा वडंबा पथरई मध्ये ४६५० मते घेऊन विजयी झाल्या. काँग्रेसचे कैलास यशवं त राऊत बोथिया पालोरा मध्ये ४९२१ मतानी विजयी झाले. कांद्री सोनेघट मध्ये शिवसेनेचे संजय रमेश झाडे हे ३३५३ मते घेऊन विजयी झाले.मनसर शितलवाडी मध्ये भाजपचे सतीश श्राव ण डोंगरे हे ४३८३ मते घेऊन विजयी.

नगरधन मध्ये कांग्रेसचे दुधराम लोळकु जी सव्वालाखे हे ४३७४ मते घेऊन विजयी झाले. पंचायत समिती च्या निवडणुकीत पथरई मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत बजरंग कोडवते १४७३ मते घेऊन, वडंबा मध्ये काँग्रेसचे रवींद्र रामप्र साद कुमरे २३०२ मते घेऊन विजयी बोथिया (पालोरा) मध्ये शिवसेने चे संजय पुनारामजी नेवारे १४२८ मतानी विजयी, उमरी मध्ये काँग्रेसच्या भुमेश्वरी विश्वनाथ कुंभलकर ३०२९ मते घेऊन, कान्द्री मध्ये शिवसेनेच्या रिता भोला कठोते १५६६ मते घेऊन, सोनेघाट मध्ये शिवसेनेच्या मंगला मनोज सरोते २३९८ मते घेऊन, मनसर मध्ये कॉंग्रेस च्या कला उमेश ठाकरे २६५२ मते घेऊन, शितलवाडी मध्ये भाजपाचे नरेंद्र चंदन जी बंधाटे २४७० मते घेऊन, नगरधन मध्ये काँग्रेसचे भूषण गजानन होलगिरे २५७१ मते घेऊन व भंडारबोडी मध्ये कॉग्रेसच्या पिंकी सुशील राहाटे हया २७५५ मते घेऊन विजयी झाले.

सर्वच पक्षातील वरिष्ठ नेते ,कार्यकर्ते ,चाहते व मित्र परिवार तसेच कुटुंबीयांनी स्व .घनश्यामराव किंमतकर सांस्कृतिक सभागृह रामटेक येथे विजयी झालेल्या उमेदवारांचे हार घालून ,गुलाल उधळून व फटाक्यांची आतिषबाजी करून बँड बाजासह त्यांचे स्वागत केले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटीयरे आणि सहाय्य क निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या निवडणूक मतमोजणी प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी वर्गाने अखंड परिश्रम घेतले. तसेच शांतता,कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नयन अलुरकर व पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी वर्गाने कडेकोट व चोख बंदोबस्त ठेवला.