Published On : Wed, Mar 21st, 2018

काँग्रेसने कॅम्ब्रिज एनालिटिका कंपनीची सेवा घेतली नाही : दिव्या स्पंदना

Advertisement


नवी दिल्ली : काँग्रेसने कधीही कॅम्ब्रिज एनालिटिका कंपनीची सेवा घेतली नसून ते तसे करणारही नसल्याचे काँग्रेस आयटी सेलच्या प्रभारी दिव्या स्पंदना यांनी म्हटले आहे. कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या यासंदर्भातील वक्तव्याचे खंडन करताना त्या बोलत होत्या.

ही कंपनी उजव्या विचारसरणीच्याल पक्षांसोबत काम करते उदारमतवादी पक्षांसोबत काम करत नाही. त्यांच्या वेबसाईटने स्वत: म्हटले आहे कि ते भाजप सोबत काम करतात. कंपनीकडून बिहारच्या 2010 च्या निवडणुकीत काम करण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या वेबसाईटमध्ये लिहीले आहे कि ‘आमच्या ग्राहकांचा मोठी विजय झाला आहे. आम्ही जेवढे उद्दीष्ठ ठेवले होते. त्याच्या 90 टक्के जागा आमच्या ग्राहकाला मिळाल्या आहे. या निवडणुका जेडीयू ने जिंकला होता आणि त्यावेळी पक्ष जेडीयूसोबत आघाडीत होता. डाटा चोरीच्या प्रकरणात ही कंपनी फसलेली असून या कंपनीची सेवा काँग्रेस ने घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.