नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या कथित अनियमित कारभाराविरोधात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महाल येथील गांधीबाग झोन कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी मनपातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने फायर एनओसीशिवाय मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामांना परवानगी दिली जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध प्रलंबित प्रश्नांवर मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. अवैध बांधकामांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
दरम्यान, आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत फटाके जप्त केले आणि काही आंदोलकांना पोलीस वाहनात बसवून तेथून हटवले.
यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ शाब्दिक वाद तसेच किरकोळ झटापट झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews
कोंढाली में फार्म हाउस धू-धूकर जला, 40 मिनट में खाक! #NagpurNews #Chandanpardi...





