कामठी :-कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त असताना त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारच्या इंधन व गॅसच्या अन्यायी दरवाढीविरोधात अजनी,तालुका कामठी येथे काँग्रेस कमिटीतर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व महाराष्ट्र काँग्रेस चे महासचिव श्री.सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
या वेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्या अवंतिका ताई लेकुरवाळे, उपसभापती पंचायत समिती कामठी आशिषजी मल्लेवार,अध्यक्ष युथ कॉंग्रेस कामठी तालुका दिनेश ढोले, महाराष्ट्र प्रदेश यूथ कांग्रेस महासचिव इरशाद शेख,महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सेवादल महासचिव राजकुमार गेडाम,कामठी ग्रामीण अध्यक्ष सेवा दल किशोर धांडे, कामठी शहर कांग्रेस सेवादल अध्यक्ष मोहम्मद सुल्तान, नागपुर जिल्हा ग्रामीण कांग्रेस सेवा दल महासचिव सोहेल अंजुम, उपसरपंच गादा मधुकरजी ठाकरे,मोतिराम इंगोले, हेमराज गोरले, अतुल चौधरी,चंद्रभान दवांडे, शेख बशीर, शेख सोहेल, आकाश भोकरे, मंजू मेश्राम, नामोद जोडपे, संजू ठाकरे,विनोद गावंडे,प्रमोद खोब्रागडे,राजेश मेश्राम,कमलाकर बोगरे व कार्यकर्ता उपस्तिथ होते.