Published On : Mon, Nov 28th, 2022
By Nagpur Today Nagpur News

विजेत्या बास्केटबॉल संघातील खेळाडूंचा सत्कार

बलाढ्य पुणे संघाचा पराभव करून नागपूर संघाच्या मुलींनी मारली बाजी

नागपूर: नुकतेच धुळे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र ज्युनिअर बास्केटबॉल चॅम्पियनशिपमध्ये मुलींच्या नागपूर जिल्हा संघाने बलाढ्य पुणे संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजेत्या मुलींच्या दमदार कामगिरीचे कौतुक करीत नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेद्वारे त्यांचा सत्कार करण्यात आला. सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी नूतन भारत युवक संघ येथे सर्व विजेत्या मुलींचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या सत्कार सोहळ्याला महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. धनंजय वेळूकर, नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी, नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रणय घाटे, सचिव भावेश कुचनवार, अभय कपले, महेश उपदेव यांच्यासह खेळाडू मुलींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विजेत्या नागपूर जिल्हा मुलींच्या संघातील प्रत्येक खेळाडूला २१०० रुपये प्रत्येकी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे खासदार क्रीडा महोत्सव समितीतर्फे खेळाडूंना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. धनंजय वेळूकर यांच्याशी चर्चा करून आगामी खासदार क्रीडा महोत्सवामध्ये महाराष्ट्र सीनिअर आमंत्रित बास्केटबॉल स्पर्धा घेण्याची तयारी नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष माजी महापौर तथा खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी दाखविली व त्यांच्या या तयारीला डॉ. धनंजय वेळूकर यांनी स्वीकृती प्रदान केली. यासाठी संदीप जोशी यांनी त्यांचे आभार देखील मानले.

विजयी संघाचे प्रशिक्षक अरविंद गरुड, सहप्रशिक्षक धीरज कडव यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

Advertisement
Advertisement