Published On : Tue, Sep 1st, 2020

मानवतेच्या दृष्टिकोनातून रोटरीचे कार्य अभिनंदनीय : महापौर संदीप जोशी

Advertisement

रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ-ईस्टतर्फे एक हजार व्हीएलटीएम कीट मनपाला प्रदान

नागपूर: जेव्हा-जेव्हा संकटे आलीत तेव्हा-तेव्हा रोटरी क्लबने स्थानिक संस्थांना आणि शासकीय संस्थांना मदतीचा हात दिला. आता कोव्हिड विषाणूच्या संक्रमण काळात नागपूर महानगरपालिकेला रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ-ईस्टने दिलेला मदतीचा हात मानवतेच्या दृष्टिकोनातून अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी केले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ-ईस्टच्या वतीने कोव्हिड-१९ विषाणूच्या चाचणीमध्ये आवश्यक असलेल्या व्हायरल लायसिस ट्रान्सपोर्ट मीडियम (व्हीएलटीएम) च्या एक हजार किट नागपूर महानगरपालिकेला प्रदान करण्यात आल्या. महापौर संदीप जोशी यांनी मनपाच्या वतीने त्या स्वीकारल्या. एक हजार किटची किंमत एक लाख ५६ हजार इतकी आहे. त्यापैकी ५०० किट रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टतर्फे तर ५०० किट रोटरीयन ब्रिजवल्लभ चांडक यांच्या वतीने प्रायोजित करण्यात आल्या.

महापौर संदीप जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात स्थायी समिती अध्यक्ष श्री.विजय झलके, सत्तापक्ष नेता श्री.संदीप जाधव, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, पास्ट डिस्ट्रीक गर्वनर राजे संग्रामसिंह भोसले, अध्यक्ष राजे रघुवीरसिंह भोसले, सचिव राजीव वरभे, ब्रिजवल्लभ चांडक, महेश अंधारे आदी उपस्थितीत होते. ब्रिजवल्लभ चांडक यांनी प्रस्तावना केली. संचालन महेश अंधारे यांनी केले. आभार राजीव वरभे यांनी मानले. यावेळी रोटरीयन विवेक ठवकर, प्रवीण तऱ्हाटे, किशोर राठी, रितेश गाणार उपस्थित होते.

Advertisement
Advertisement