Published On : Thu, May 27th, 2021

म्युकरमायकोसिस जनजागृती मोहिमेला अध्यक्षा बर्वे व खासदार तुमानेंच्या शुभेच्छा

Advertisement

महसूल,कृषी,सार्वजनिक बांधकामचे वरिष्ठ अधिकारी करताहेत नेतृत्व

नागपूर: -लवकरच पावसाळा सूरू होत आहे.पावसाळयात अनेक आजार डोके वर काढतात.कोविड संसर्ग नियंत्रणासाठी प्रशासन कार्यरत असतानाच आता म्युकरमायकोसिसचे आव्हान यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.मात्र म्युकरमायकोसिससोबत लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. महसूल,कृषी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिका-यांच्या नेतृत्वात रोज गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे..आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात या अनुषंगाने बैठक झाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे खासदार कृपाल तुमाने,जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या उपस्थितीत आज अधिकाऱ्यांच्या चमूला शुभेच्छा देण्यात आल्या.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यासाठी दोन अधिकाऱ्यांची अश्या एकूण 26 अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसिलदार व खंड विकास अधिकारी त्यांना याकामी मदत करणार आहेत. कामठी तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी, श्याम मदनुरकर,कार्यकारी अभियंता श्रीमती पाटणे, मौदा तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, कार्यकारी अभियंता बांधवकर, उमरेडसाठी उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.यु.एस.हिरूडकर कुही तालुक्यासाठी कार्यकारी अभियंता श्री.देवळ,उपविभागीय कृषी अधिकारी पाटील, भिवापूर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी‍‍शिवनंदा लंगडापुरे उपविभागीय कृषी अधिकारी डाखरे,सावनेर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपविभागीय कृषी अधिकारी अरविंद उपरीकर,काटोल तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी ‍शितल देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही.एस.निमजे,कळमेश्चर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे ,कार्यकारी अभियंता, सतिश अंभोरे,नरखेड तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, कार्यकारी अंभियंता येरखेडे,हिंगणा तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, उप अभियंता निलेश मानकर,नागपूर ग्रामीणसाठी मिनल कळसकर, प्रकल्प अधिकाारी विवेक इलमे,रामटेक तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी हेमा बढे उपविभागीय कृषी अधिकारी श्री.मिसाळ,पारशिवनी तालुक्यासाठी जोगेंद्र कटीयार,उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.किटे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या जनजागृती मोहिमेसाठी ग्रामीण भागातील जनता हा लक्ष्यगट आहे.लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर करून लसीकरणाविषयी नागरिकांना प्रोत्साहित करण्यावरही भर राहणार आहे.जिल्हा माहिती कार्यालयाव्दारे निर्मित व्हीडीओव्दारे या मोहिमेला मदत होणार आहे.तिस-या लाटेच्या प्रतीबंधासाठी ग्रामीण भागात जनजागृती करणे,आरोग्य यंत्रणा सुसज्ज करणे,आशा अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षीत करून त्यांची क्षमताबांधणी करणे यावरही भर देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी खासदार कृपाल तुमाने यांनी आदिवासी व काही तालुक्यात लसीकरणाला मिळालेल्या कमी प्रतीसादाविषयीचा मुददा मांडला. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पालकांना विशेषत मातांचे प्राधान्याने लसीकरण झाले पाहीजे. तरच त्या बालकांची काळजी घेउु शकतील असे मत त्यांनी मांडले.मधुमेह असलेल्या रुग्णांना म्युकरचा धोका अधिक आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील ज्या नागरिकांना कोविड होऊन गेला आहे.त्यांची मधुमेह तपासणी करणे अत्यावश्यक आहे.जेणेकरून म्युकरमायकोसिसचा धोका टाळता येईल.

जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी ग्रामीण भागातील आशा,अंगणवाडी सेविका या फ्रंटलाईन वर्करना दुसऱ्या लसीचा डोस देण्यात यावा जेणेकरून त्यांना सुरक्षितता राहील व त्या कोरोनाविषयक कार्यात हातभार लावू शकतील. म्युकरमायकोसिस सोबतच कोवीड सुरक्षा त्रिसुत्री व लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील जनतेचे प्रबोधन करण्याची सूचना खासदार कृपाल तुमाने यांनी केली. प्रशासनासोबत पदाधिकाऱ्यांनीही माझे कार्यक्षेत्र-माझी जबाबदारी संकल्पनेनुसार सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. या सर्व जनजागृती मोहिमेचा वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे.क्षेत्रीय स्तरावरील काही सूचना असल्यास त्या स्विकारून व्यापक प्रचार-प्रसिध्दी करण्यात येईल.

म्युकरमायकोसिस व कोविडच्या अनुषंगाने नुकताच पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी रामटेक-पारशिवणी दौरा केला आहे.तर जिल्हा प्रशासनाने तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय टास्क् फोर्सचे गठण करण्यात आले आहे. टास्क् फोर्सच्या नियमीत बैठका व आढावा सुरू आहे.जिल्हा माहिती कार्यालयाव्दारे होर्डीग,सोशल मिडीया व व्हीडीयो व तज्ञांच्या मुलाखतीचे व्हिडीयोव्दारे माहिती देण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement