Published On : Fri, Jun 12th, 2020

रेल्वे रुग्णालयात गोंधळ, भौतिक दुरत्वाचे उल्लघन

– धरणे, घोषणा आणि गर्दी
– …तर कशी करता येईल कोरोनावर मात?

नागपूर: कोरोना या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भौतिक दुरत्व राखने हाच एक मुख्य उपाय आहे. यासाठी शासन गंभीर असून प्रयत्नशील आहे. रेल्वे प्रशासनही पाहिजे त्या सर्व उपाययोजना करीत आहे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असताना गुरूवारी दुपारच्या सुमारास डीआरएम कार्यालय परिसरातील रेल्वे रुग्णालयासमोर भौतिक दुरत्वाचे उल्लघन करण्यात आले. अलिकडेच रेल्वेतील कर्मचारी कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले तर काही कर्मचाèयांना क्वॉरेंटाईन करण्यात आले. शहरात बाधीतांची संख्या आठशे पार झाली, अशा स्थितीत भौतिक दुरत्वाचा फज्जा उडविने कितपत योग्य आहे आणि यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे साèयांचे लक्ष लागले आहे.

रेल्वे सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल रेल्वे मजदुर युनियनच्या पदाधिकाèयांनी आज गुरूवारी दुपारच्या सुमारास रेल्वे रुग्णालयाच्या मुख्य चिकित्सा अधिकारी हेडाउ यांची भेट घेतली. यावेळी जवळपास १५ ते २० पदाधिकाèयांचा समावेश होता. रुग्णालयाअंतर्गत विषयावर चर्चा करून बाहेर पडत असतानाच मुख्य फार्मसिस्ट हे सीएमएस हेडाउ यांच्या कार्यालयात जात होते. दोघेही अमोरा समोर आले आणि वादाची qठणगी पेटली. पाहता पाहता गोंधळ झाला. रुग्णालयातील एका कर्मचाèयामुळे हा वाद वाढत गेल्याच्या कारणावरून एनआरएमयुच्या पदाधिकाèयांनी संतापाच्या भरात रुग्णालयातसमोर रेल्वे प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत मुख्य फार्मसिस्टला निलंबित करण्याची मागणी केली.

दरम्यान मध्य रेल्वेचे एडीआरएम यांनी सीएमएस हेडाउ यांची भेट घेवून या गंभीर विषयावर चर्चा केली. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणावर तोडगा निघाला नव्हता. मात्र, आजच्या प्रकारामुळे भौतिक दुरत्वाचा चांगलाच फज्जा उडाला. शहरात अशीच स्थिती राहील्यास कोरोना नियंत्रणात कसा येईल? अशी चर्चा कर्मचाèयांत ठिकठिकाणी सुरू होती.

८ जूनला वार्निंग नोटीस
सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार रुग्णालयातील एक कर्मचारी एनआरएमयु या संघटनेचा पदाधिकारी आहे. त्या कर्मचाèयाने रुग्णाला चुकीचे औषधी दिल्याच्या कारणावरून त्याला मुख्य फार्मसिस्ट यांनी वार्निंग नोटीस बजावली. याच कारणावरून एनआरएमयुच्या पदाधिकाèयांनी सीएमएस हेडाउ यांची भेट घेवून चर्चा केली. दरम्यान मुख्य फार्मसिस्ट येताच वाद चिघळला.

रुग्णालयाची शांतता भंग
रुग्णालय शांतता झोन परिसरात येतो. येथील भरती रुग्णांना हॉर्न, फटाके, बॅन्ड आणि आरडा ओरडचा त्रास होवू नये म्हणून नियमावली तयार करण्यात आली. बरेचदा रुग्णालयात गंभीर रुग्ण उपचार घेत असताना. रुग्णालयाची शांतता भंग होत असल्याने प्रशासनाची जबाबदारी काय? असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित होत आहे.