Published On : Tue, Aug 22nd, 2017

“सी प्लेन प्रकल्पा संदर्भात टूर्स, ट्रेव्हल्स आणि हॉटेल व्यावसायीक सोबत चर्चा सत्राचे आयोजन”

Advertisement

Sea Plane
नागपूर:
विदर्भपर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने नागपूर-शेगाव, नागपूर-ताडोबा, नागपूर-नवेगाव बांध (पेंच), कोराडी इत्यादि ठिकाणी जॉय राईड, सुलभ परिवहन पर्याय, आपत्ती व्यवस्थापन, हवाई रुग्णवाहिका सेवा, व्याघ्रपर्यटन इत्यादि सेवा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून ‘सी प्लेन’ प्रकल्प राबविण्याचा शासनाचा मानस आहे.

पर्यटक हा सी प्लेन प्रकल्पांचा मुख्य केंद्रबिदू असल्याकारणाने त्यांना देण्यात येणाऱ्या पर्यटन सुविधाबद्दल चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्याविद्यमाने टूर्स , ट्रव्हल्स अँड होटल असोशिएशन ची बैठक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ च्या कार्यालयात घेण्यात आली.

सदर बैठक नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय वाघमारे यांच्या उपस्थितीत पार पडली. पर्यटक हा मुख्य घटक असल्याने पर्यटन सेवा त्याला सुलभ व स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी, पर्यटकांना पर्यटनास आकर्षित करणारे व सोईचे ठरणारे प्रवासी पैकेज दिल्या जावे इत्यादि सूचना या ठिकाणी उपस्थित असोसिएशन च्या प्रतीनिधिंना देण्यात आल्या.

तसेच पर्यटन सेवा नियोजनबध्द असावी जेणे करून व्यावसाईक स्तरावर सी प्लेन प्रकल्पाला यश प्राप्त करता येईल तसा व्यवहार्यता अहवाल (Feasibility Report )नासुप्र ला सादर करावा. सबंधित प्रकल्पासंदर्भात माहिती करीता नासुप्रशी संपर्क साधावा आणि टूर्स,ट्रेव्हल्स आणि हॉटेल व्यवसायकांनी आपल्या स्तरावर सी प्लेन प्रकल्पाचा प्रचार आणि प्रसार करून विदर्भ पर्यटनास उत्तेजना मिळवून द्यावी असे आव्हान ही डॉ. म्हैसेकरांनी केले.