Published On : Mon, Dec 31st, 2018

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षिस वितरणासह थाटात समारोप

कन्हान : – ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,सालवा येथे मौदा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा
बक्षिस वितरणासह थाटात समारोप करण्यात आला . स्थानिक ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,सालवा येथे दि. २७ व २८ डिसेंबर २०१८ ला मौदा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २८ डिसेंबर २०१८ ला विद्यालयाच्या प्रांगणात बक्षिस वितरणासह समारोप संपन्न झाला.

बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम मा.श्री रामदास बारबदे सहसचिव श्री साई सेवा शिक्षण मंडळ यांच्या अध्यक्षेत तर विशेष अतिथी मा. प्रकाश सोमलवार सचिव सोमलवार शिक्षण संस्था नागपुर, मा.विजयराव कठाळकर सचिव श्री साई सेवा शिक्षण मंडळ, श्री मनोहर बारस्कर गट शिक्षणाधिकारी पं. स. मौदा, मा. आशाताई गणवीर शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.मौदा, श्री धनपाल हारोडे सरपंच येसंबा, मुख्यध्यापक श्री राजेश मोटघरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रदर्शनीत तालुक्यातील उच्च प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी उत्सर्फुतपणे सहभाग घेतला.

विज्ञान प्रतिकृती मूल्यमापन केल्यानंतर उच्च प्राथमिक व माध्यमिक गटातून ग्रामीण विकास विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला . मा. प्रकाश सोमलवार यांनी विद्यार्थाना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातुन विज्ञान प्रदर्शनीचे महत्त्व मुख्यध्यापक श्री राजेश मोटघरे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री मयूर भोंबे यांनी तर अभार प्रदर्शन आशाताई गणवीर शिक्षण विस्तार अधिकारी पं. स.मौदा यांनी केले.