Published On : Tue, Jun 30th, 2020

घरगुती ग्राहकांना तीन हप्त्यात वीज बिलभरण्याची सवलत

Advertisement

एकरकमी वीज बिल भरल्यास 2 टक्के सूट:ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची घोषणा

नागपूर: लॉकडाउन काळातील एकत्रित वीज बिलामुळे संभ्रमात असणाऱ्या वीज ग्राहकांना दिलासा देत घरगुती ग्राहकांना तीन हप्त्यात वीज बिलभरण्याची तसेच एकरकमी वीज बिल भरल्यास 2 टक्के सूट देण्याची सवलत ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केली.

ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार जून २०२० घरगुती ग्राहकांसाठी वीजबिल भरण्याची पघ्दत निश्चित करण्यात आली आहे.त्यानुसार घरगुती ग्राहकांसाठी ३ हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची सवलत,महावितरणच्या कार्यालयात जाण्याची ग्राहकांना कोणतीही गरज नाही.तसेच कुठल्याही वीजबिल भरणा केंद्रावर जाऊन कमितकमी वीजबिलाच्या १/३ रक्कम भरता येईल.संपूर्ण वीजबिल एकाचवेळी भरल्यास २ टक्क्यांची वीजबिलामध्ये सूट देण्यात येईल.याशिवाय ज्या ग्राहकांनी या अगोदर संपूर्ण रक्कमेच्या वीजबिल भरले असल्यास, त्यांना देखील ती सूट त्यांच्रूा वीजबिलामध्ये देण्यात येईल.

Ø जे घरगुती ग्राहक लॉकडाऊनमुळे आपल्या मूळगावी गेल्यामुळे त्यांचा वीजवापर हा अगदी कमी झाला आहे. तरी त्यांना मीटर रीडिंग न घेतल्यामुळे मागील वीजवापरानुसार सरासरी वीजबिल देण्यात आले आहे. अशा ग्राहकांच्या वीजमीटरचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन, त्यांचे वीजबिल दुरूस्त करण्यात येतील.

वीज नियामक आयोगाने कोरोना महामारीच्या अनुषंगाने शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची प्रत्यक्ष जागेवर जावून मीटर वाचन व वीज बिल वितरण न करण्यास महावितरणला आदेश दिले होते.लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणने मिटर रीडींग व देयक वाटपाचे काम बंद ठेवल्याने एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीज वापराची देयके आकारण्यात आलेली आहेत.

1 जून 2020 पासून शासनातर्फे प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने महावितरणने ग्राहकांना मिटर रीडींगनुसार वीज देयक देण्यासाठी 1 जून 2020 पासून प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने व शासनाने कोविड 19 संदर्भात वेळोवळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करुन मिटर रीडींग, वीज देयके वाटप तसेच वीज देयक संकलन केंद्रे पुन्हा सुरु केलेली आहेत.माहे जून-2020 मध्ये देयकाची रक्कम जास्त दिसण्याचे कारण म्हणजे लॉकडाऊन काळात (एप्रिल व मे महिना) आलेली सरासरी देयके ही कमी सरासरी युनिटने ( डिसे. जाने. व फेब्रुवारी ) हिवाळया तील वीज वापरावर दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला घरगुती ग्राहकांच्या विजेच्या वापरात Work from Home व उन्हाळयामुळे मागच्या वर्षी पेक्षा वाढ झालेली आहे जी माहे जून-2020 च्या बिलात दिसून येते आहे.

जून-2020 चे बिल कसे योग्य आहे हे ग्राहकांना समजावून सांगण्यासाठी तसेच ग्राहकांच्या बिलांचे तक्रारीचे निराकरण करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता यांना खालील प्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.त्यात 1) सर्व क्षेत्रीय कार्यालयात ग्राहक मदत कक्ष स्थापन करणे2) ग्राहकांशी वेबिनार आणि फेसबुक लाइव संवाद साधणे. 3) स्थानिक वृत्त वाहिनी व FM रेडीओ चॅनलवर मुलाखत देणे.4) स्थानिक वृत्त वाहिनीवर जाहिरात पट्टी देणे.5) आठवडा बाजार व रहिवाशी सोसायटीमध्ये मळावे घेणे.6) मीटर रीडर व बिल वाटप करणारे कर्मचयाऱ्यांना प्रशिक्षण देऊन ग्राहकांसोबत संवाद साधणे. 7) एसएमएस पोस्टर्सद्वारे वीज आकारणीबद्दल सुलभ माहिती देणे.वरील सर्व उपाय योजनांचा वापर करून देखील ग्राहकांचे समाधान न झाल्यास ईमेल आयडी

8) energyminister@mahadiscom.in व मोबईल क्र. 9833567777 व 9833717777 यावरून ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन त्वरित करण्यात येईल.अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.