नागपूर : राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. मात्र असे असले तरी आता सरकारने या योजनेसंदर्भात नवीन नियम आखले. त्यामुळे पात्र महिलांची डोकेदुखी वाढणार आहे. आता दरवर्षी जून महिन्यात आता महिलांना ई-केवायसी करावे लागणार आहे. जेणेकरुन महिलांची सर्व माहिती खरी आहे की खोटी याची माहिती मिळणार आहे. या योजनेत तब्बल २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केला होता. त्यातील २ कोटी ४१ लाख महिला पात्र ठरल्या होत्या.
योजनेच्या निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेतलेल्या पाच लाख बहिणींना सरकारने गेल्याच आठवड्यात अपात्र ठरविले होते. या योजनेवरील उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सरकारचा नवा नियम काय?
लाडक्या बहिणींना आता दरवर्षी जून महिन्यात केवायसी करणं बंधनकारक राहणार आहे. 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी आणि लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी करूनच लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.