Published On : Thu, Jan 3rd, 2019

शहीद गोवारी उड्डाणपूलाच्या वर मेट्रोच्या स्पॅनचे कार्य पूर्ण

नागपूर : सीताबर्डी येथे शहीद गोवारी उड्डाणपूलाच्या वर सुरु असलेले वायाडक्टचे कार्य गुरवार, ३ जानेवारी’ला यशस्वीरित्या पूर्ण झाले. मंगळवार, १८ डिसेंबर २०१८ पासून याठिकाणी गर्डर लॉन्चिंगच्या कार्याला सुरुवात झाली होती. आधुनिक तंत्रज्ञाच्या आणि अनुभवी अभियंत्यांच्या माध्यमातून केवळ १५ दिवसाच्या अल्प कालावधीत हे संपूर्ण कार्य पूर्ण झाले.

निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी याठिकाणी रात्र दिवस कार्य केले. उल्लेखनीय म्हणजे गेल्या १५ दिवसात पडलेल्या कडाक्याच्या थंडीत मेट्रोचे अधिकारी आणि कर्मचारी मागे न हटता काम करत राहिले. दरम्यानच्या काळात ३.५ डिग्री सेल्सियस तापमान असतांना देखील या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पूर्ण हिमतीने याठिकाणी कार्य केले.


शहीद गोवारी उड्डाणपूलाच्या वरच्या स्पॅन साठी एकूण १३ सेगमेंट लावण्यात आले, या सर्व सेगमेंट’चे एकंदर वजन सुमारे ४५ मॅट्रिक टन होते. सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन करत याठिकाणी पियर क्र. २९२ ते २९३ दरम्यान ३६ मीटर लांबीच्या स्पॅनसाठी १७ मीटर उंचीवर गर्डर लॉन्चिंगचे कार्य पूर्ण केल्यानंतर (रिच-३ कॉरिडोर)लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते मुंजे चौक मेट्रो जंक्शन पर्यंतचे कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न महा मेट्रो करत आहेत.

संपूर्ण कार्य स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून ट्राफिक पोलीस यांच्या देखरेखीत करण्यात आले. हायब्रिड इंरेव्कशन पध्द्तीने (Hybrid Erection Scheme’) ग्राउंड सपोर्ट सिस्टम (Ground Support System) आणि ओवरहेड लॉन्चिंग गर्डरच्या साह्याने कार्य होत असतांना महा मेट्रोचे अधिकारी, कंत्राटदार मेसर्स, अफकॉन्स आणि जनरल कंसलटंट, जलद कृती पथक (QRT) कार्यस्तळी उपस्थित होते.