Published On : Wed, Mar 10th, 2021

प्रजापती नगर मेट्रो स्टेशन व रिच – ४ चे कार्य गतीने पूर्ण करा : दीक्षित

– डॉ. दीक्षित यांनी प्रजापती नगर मेट्रो स्टेशनची केली पाहणी

नागपूर – सेंट्रल एव्हेन्यू,(रिच -४) मार्गावर डिसेंबर २०२१ पर्यंत मेट्रो सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस असून सदर मार्गावर व्हायाडव्कट आणि स्टेशनचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु आहे तसेच आनंद टॉकीज येथे २३१ मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिताबर्डी ते कॉटन मार्केट पर्यत निर्माण कार्य देखील सुरु आहे. याच अनुषंगाने महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आज सदर मार्गिकेची व प्रजापती नगर मेट्रो स्टेशनची पाहणी करून मेट्रो अधिकारी व कंत्राटदार यांच्या कडून विस्तुत आढावा घेतला.

सदर पाहणी दरम्यान डॉ. दीक्षित यांनी निर्माण कार्य जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना तसेच ज्याठिकाणी कार्य पूर्ण झाले आहेत तेथील परिसराचे समतलीकरन करण्याच्या सूचना देखील केल्या. मुख्य म्हणजे सदर मार्गावर सतत वाहनाची गर्दी असते या परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात तसेच अन्य ठिकाणी जात असतात त्यामुळे नागरिकांना जास्त त्रास होऊ नये अश्या सूचना देखील अधिकाऱ्यांना केल्या. सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.३० किमीच्या या मार्गावर एकूण ०९ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे

*रिच – ४ (सिताबर्डी ते प्रजापती नगर) कॉरीडोरची आकडेवारी पुढील प्रमाणे :*
सिताबर्डी ते प्रजापती नगर मार्गिकेवर रूळ बसविण्याचे कार्य सुरु असून ९०% व्हायाडक्टचे कार्य पूर्ण झाले आहे. ज्यामध्ये नागपूर रेल्वे स्टेशन ७२ %, दोसर वैश्य चौक ९०%, अग्रसेन चौक ९७%, चितार ओळी ७५%, टेलीफोन एक्सचेंज चौक ८५%, आंबेडकर चौक ६८%, वैष्णोदेवी चौक ८५%, प्रजापती नगर ५०% स्टेशनचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे.

यावेळी संचालक (प्रकल्प) श्री. महेश कुमार यांनी व्यवस्थापकीय संचालक यांना मेट्रो स्टेशनची सविस्तर माहिती प्रदान केली. यावेळी संचालक(रोलिंग स्टॉक) श्री. सुनील माथूर, कार्यकारी संचालक श्री. अनिल कोकाटे, श्री.अरुण कुमार, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.