Published On : Fri, May 8th, 2020

राष्ट्रीय महामार्गाची कामे तातडीने पूर्ण करा.विधानसभा अध्यक्ष मा.ना.नानाभाऊ पटोले यांचे निर्देश

Advertisement

मुख्यमंत्री सहायता निधिचा ही घेतला आढावा

नागपूर: राज्यातील गरजु लोकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या द्वारे मदत केली जाते, ही मदत नागपूर विभागात कशी सुरू आहे, गरजु लोकांना त्याचा लाभ कसा मिळतो आहे यासंबंधी तसेच नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम कसे सुरु आहे याबाबतची आढावा बैठक महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. ना. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. गरजू लोकांना किंवा अर्ज केलेल्या लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ योग्य पद्धतीने मिळावा तसेच राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामे योग्य पद्धतीने व तातडीने पूर्ण व्हावीत यासंबंधीचे आदेश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री सचिवालय, हैदराबाद हाऊस नागपूर येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे नागपूर विभागीय कार्यकारी अभियंता नरेश बोरकर तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कक्ष प्रमुख तथा सदस्य सचिव डॉ. के. आर. सोनपुरे हे देखील प्रमुख्याने उपस्थित होते.