Published On : Fri, Nov 29th, 2019

रखडलेले व प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करा : प्रवीण दटके

Advertisement

प्रकल्प विशेष समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे राज्य सरकार व केंद्र सरकारकडे प्रस्तावित असलेल्या व रखडलेल्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश माजी महापौर व प्रकल्प विशेष समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिले.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेच्या बीओटी, पीपीपी, केंद्र सरकार व राज्य सरकारमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रवीण दटके यांच्या अध्यतेखाली प्रकल्प विशेष समितीची बैठक गुरूवारी (ता.२८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. बैठकीला उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, समिती सदस्य विजय झलके, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, शहर अभियंता मनोज तालेवार, नगरचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरात सुरू असलेल्या सीमेंट रस्त्यांच्या कामाचा आढावा यावेळी प्रवीण दटके यांनी घेतला. सीमेंट रस्ता टप्पा एकमध्ये कामे पूर्ण झाले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. काही रस्त्यांमध्ये भेगा पडल्याचे दिसून आल्याचे प्रवीण दटके यांनी सांगितले. त्या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय कंत्राटदारांना देयके देऊ नये, असे निर्देश प्रवीण दटके यांनी दिले. टप्पा दोनमधील सीमेंट रस्त्यामध्ये ५९ रस्त्यांपैकी ५० रस्ते पूर्ण झाले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अमीन अख्तर यांनी दिली. उरलेल्या नऊ रस्त्यांपैकी पाच रस्त्यांची कामे सुरू आहेत. उर्वरित चार रस्ते परवानगीसाठी थांबले होते, त्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून टप्पा दोनचे काम ३१ मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ता पूर्ण झाल्यावर जलप्रदाय विभाग, विद्युत विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेण्याचे निर्देश प्रवीण दटके यांनी दिले.

टप्पा तीनमधील ३९ रस्त्यांपैकी २३ रस्ते पूर्ण झाले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. काही रस्त्यांमध्ये विद्युत व जलप्रदाय विभागाद्वारे केबलिंग करण्याचे काम सुरू आहे. त्याचे पुर्नभरण व्यवस्थित होते की नाही याची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांनी घ्यावी. ते तपासून घ्यावे, असे निर्देश प्रवीण दटके यांनी दिले. तिन्ही टप्प्यांमधील सीमेंट रस्ते हे वेळेत पूर्ण करावे, त्याचा बार चार्टसह अहवाल सादर करावा, असेही माजी महापौर प्रवीण दटके यांनी सांगितले.

शहरात लावण्यात येणाऱ्या एलईडी लाईट्सबाबत श्री. दटके यांनी यावेळी आढावा घेतला. शहरात एक लाख ३१ हजार एलईडी लाईट्स लावणे अपेक्षित होते. महानगरपालिकेद्वारे एक लाख ३७ हजार एलईडी लाईट्स लावण्यात आलेले आहे. यामुळे मनपाच्या वीज देयकांमध्ये मोठी बचत होत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ए.एस.मानकर यांनी दिली. प्रवीण दटके यांनी याबद्दल कौतुक करत हा विषय महापौरांना कळविण्यात यावा, असेही सांगितले. शासनाद्वारे INCENTLUCTION OF GOOD TRAFFIC BEHAVIOUR हा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याबाबत व्हीएनआयटीशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये जे नागरिक वाहतुकीचे नियम व्यवस्थितरीत्या पाळतील त्यांना ओला, उबेर या कंपनीमार्फत इंसेंन्टिव्ह मिळणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ए.एस.मानकर यांनी दिली. हा प्रकल्प पथदर्शी असून याची माहिती महापौर व आयुक्तांना देण्यात यावी, असेही प्रवीण दटके यांनी सांगितले.

यानंतर समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी डीपी रस्त्यांचा आढावा घेतला. यामध्ये केळीबाग रस्ता, रामजी पहेलवान रस्ता, जुना भंडारा रस्ता, पारडी रस्ता, रमना मारोती रस्ता यांचा समावेश होता. रमना मारोती रस्त्याबाबत कार्यादेश पूर्ण झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. मनपामार्फत प्रस्तावित असलेल्या बांधकाम प्रकल्पांचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. यामध्ये ऑरेंज सिटी प्रकल्प, बुधवार बाजार महाल, सक्करदरा बाजार, कमाल टॉकीज प्रकल्प, टाऊन हॉल, स्व.प्रभाकरराव दटके महाल दवाखाना, महाल मासोळी बाजार, डिग दवाखाना, आयसोलेशन हॉस्पीटल यांचा समावेश होता. डिग दवाखाना व आय़सोलेशन बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण आणि आरोग्यअधिकारी डॉ.सरिता कामदार यांनी दिली. महाल, मासोळी बाजार दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश प्रवीण दटके यांनी दिले.

गांधीसागर तलावाबाबत प्रस्ताव शासनाकडे असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. नाईक तलाव निरी संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले. नागनदी प्रकल्पांचा आढावा बॉटलिंग प्लांट आणि अमृत योजनेचा आढावा प्रवीण दटके यांनी घेतला

पर्यावरणपूरक दहन घाटाचा आढावा घेतला. दहन घाटावर ब्रिकेट्सद्वारे शवदहन कुठल्या घाटावर केले जाते याची माहिती जाणून घेतली. यामध्ये अंबाझऱी, मानेवाडा, सहकारनगर, मोक्षधाम, गंगाबाई, मानकापूर या ठिकाणी ब्रिकेट्सद्वारे दहन केल्या जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.सुनील कांबळे यांनी दिली. शनिवारी संपूर्ण घाटाचे दौरा करून अहवाल सादर करावा, असे निर्देश प्रवीण दटके यांनी केले. यासोबतच ब्रिकेट्सद्वारे आतापर्यंत किती शवदहन करण्यात आले, याची माहिती कळविण्याच्या सूचना प्रवीण दटके यांनी केल्या.

बैठकीला अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक, अमीन अख्तर, राजेश भूतकर, आर.एस.मानकर, सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनोज गणवीर, नगररचना विभागाचे श्रीकांत देशपांडे यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटदार उपस्थित होते.

वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या नागरिकांना आता मिळतील रिवार्ड पॉईंट्स
वाहतुकीचे नियम मोडल्यास नागरिकांना दंड भरावा लागतो मात्र आता नियमांचे पालन केल्यास नागरिकांना प्रोत्साहनपर रिवार्ड पॉईंट्स मिळणार आहेत. हे रिवॉर्ड पॉईंट्स वापरून नागरिकांना विविध कंपन्यांच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाद्वारे ही योजना प्रायोगिक स्तरावर नागपुरात सुरू करण्यात येणारआहे. नागपूर महानगरपालिका ही योजना नागपुरात राबविणार असून या योजनेस केंद्रीय मंत्रालयाद्वारे तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या आढावा बैठकीमध्ये देण्यात आली.

Advertisement
Advertisement
Advertisement