Published On : Sun, Jul 14th, 2019

एचव्हीडीएसची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करा – खंडाईत

Advertisement

नागपूर: नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात उच्च दाब वितरण प्रणाली योजनेंतर्गत(एचव्हीडीएस) सुरु असलेली शेती पंपाची कामे येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी येथे आयोजित कंत्राटदारांच्या बैठीकीत दिले.

काटोल रोड येथील महावितरण कार्यालयात आयोजित आढावा बैठीकीत त्यांनी वरील निर्देश दिले. नागपूर जिल्ह्यात उच्च दाब वितरण प्रणाली योजनेंतर्गत ३,३३७३ तर वर्धा जिल्ह्यात १,८१४ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे उद्धिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. यावर नागपूर जिल्ह्यात ६४.५८ कोटी रुपये तर वर्धा जिल्ह्यात ४१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. यातील अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विहित कालावधीत शेत पंपासाठी वीज जोडणी मिळावी यासाठी महावितरणकडून आवश्यक रोहित्राचा पुरवठा केल्या जाणार आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महावितरणची कामे स्वीकारून विहित कालावधीत पूर्ण न करणे अथवा ऐनवेळी काम अर्धवट सोडून देणे या प्रकारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकारांना आळा घालण्यासाठी आगामी काळात महावितरण प्रशासनाकडून कठोर उपाययोजना केल्या जाणार असल्याचे संकेत यावेळी उपस्थिताना देण्यात आले.

यावेळी उपस्थित कंत्राटदारांनी सध्या सुरु असलेल्या कामाच्या प्रगतीची माहिती दिली. बैठीकीस अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, दिलीप दोडके, डॉ. एस.एफ वानखेडे उपस्थित होते.

Advertisement
Advertisement