Published On : Fri, Jul 26th, 2019

सौर कृषीपंपाची कामे जलदगतीने पुर्ण करा – प्रसाद रेशमे

Advertisement

नागपूर: शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देणा-या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतील कामांना गती देण्याचे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभुत विकास) प्रसाद रेशमे यांनी आज सौर कृषीपंप पुरवठादारांच्या केले. या योजने अंतर्गत पुर्व विदर्भात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतेवेळी ते बोलत होते.

नागपूर येथील विद्युत भवन येथे आयोजित या बेठकीला मारगदर्शन करतांना ते पुढे म्हणाले की, पुर्व विदर्भावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतक-यांना सौरपंप वेळीच मिळाला तर शेतीसाठी सिंचनाला त्याची मदत मिळेल, हा सामाजिक दृष्टीकोन लक्षात ठेवून सौरपंपांच्या पुरवठादार एजन्सीने मणूष्यबळात वाढ करून अधिकाधिक सौरकृषीपंप कार्यान्वित करावे, महावितरण अधिका-यांनीही या एजन्सीजना शक्य तेवढे सहकार्य करावे, नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया व भंडारा या जिल्ह्यातील कामे प्राधान्यक्रमाने पुर्ण करण्याच्या सुचनाही प्रसाद रेशमे यांनी यावेळी केल्या.

Advertisement
Advertisement

या बैठकीला महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामिण मंडलचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे उपस्थित होते तर चंद्रपूर आणि गोंदीया परिमंडलचे मुख्य अभियंता, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया मंडलाचे अधीक्षक अभियंते व्हीडीओ कॉन्फ़रसिंगच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते सोबतच सौर कृषीपंप पुरवठादार कंपन्यांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement