Advertisement
महावितरण कडून तात्काळ वीज जोडणी
नागपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा कटिबद्ध असताना या ठिकाणी अखंडित वीज पुरवठा कायम राहावा यासाठी महावितरण कडून पावले उचलण्यात आली आहे. तसेच शहरातील दोन ठिकाणी आरोग्य यंत्रणेस महावितरण कडून अवघ्या काही तासात वीज जोडणी देण्यात आली.
कोरोनावर उपचार करणाऱ्या, आँक्सीजन निर्माण करणाऱ्या कंपन्याना वाढीव वीज जोडभार अथवा नवीन जोडणी तातडीने देण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत.
त्यानुसार महावितरण नागपूर शहर मंडल कार्यालयाने एका खाजगी रुग्णालयास थ्री फेज आणि मनपाच्या लसीकरण केद्रास सिंगल फेजची जोडणी तात्काळ दिली. यापुढेही रुग्णालये अथवा आँक्सीजन निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना तातडीने वीज जोडणी अथवा जोडभार वाढवून देण्यात येणार आहे.
Advertisement