Published On : Sat, Mar 28th, 2020

मध्यप्रदेशात पायदळ जाणा-यांना आओ साई मित्रमंडळ तर्फे भोजनदान

Advertisement

कन्हान : – आओ साई मित्र मंडळ व माऊली कॅटर्स कन्हान व्दारे नागपुर वरून पायदळ मध्य प्रदेशात जाणा-यां ना कांद्री-कन्हान टोल नाका येथे भोजन दान म्हणुन सेवाभावी सहकार्यातुन दररोज पोटभर जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये, त्याचा प्रसार रोखण्यासाठी संपुर्ण देशात २१ दिवसाचा सार्वजनिक कर्फ्यु अस ल्याने रेल्वे, बस, खाजगी वाहतूक सेवा बंद असल्याने नागपुर शहरात व जिल्ह यात मध्ये प्रदेशातील सिवनी, बालाघाट, जबलपुर येथील पोट भरण्याकरिता प्रा. कंपनी, कारखाने, बांधकाम, खाजगी कामे करणार्‍या मध्य प्रदेशातील मजुर वर्ग मोठ्या संख्येत गावाकडे जाण्यास साधन उपलब्ध नसल्याने लहान मुले, मुली, महिला, पुरूष व वयोवृद्ध, पायदळ जात आहे.

सर्वत्र बंद असल्याने उपासी पोटी रस्त्यानी जात आहे. त्यांच्या हाल अपेष्ठा पाहुन मानुसकी जागृत होऊन नागपुर जबलपुर चारपदरी बायपास महामार्गावरील कांद्री- कन्हान टोल नाका वर आओ साई मित्र मंडळ, टोल नाका कर्मचारी व माऊली कॅटर्स यानी समोर येऊन सेवाभाव म्हणुन रस्त्याने गावाकडे जाणार्‍या मजुर कुटुंब व मजुरांची पोटभर जेवणाची व्यवस्था गुरूवार (दि.२५) ला सायंकाळ पासुन करून दररोज करण्यात येणार आहे.

तसेच कन्हान नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार, ग्रामिण पत्रकार संघ, थानेदार अरूण त्रिपाठी, भुमिपुत्र बहुउद्देशीय संस्था व्दारे त्यांना खवासा मध्य प्रदेश सिमेपर्यत पोहचविण्यास सहकार्य करित आहे. तसेच काही मजुरांना माऊली कॅटर्सचे मिलींद पोपटकर यानी स्वत: च्या खाजगी वाहनाने तीन फेऱ्या मारून कन्हान ते मध्य प्रदेश सिमेपर्यत सोडुन मौल्याचे सहकार्य केले.

सेवाभावी भोजन दानाच्या यशस्वितेकरिता प्रमोद समरीत, जितु चौधरी, शेखर ठवकर,अक्षय बारके, मनोज चिकटे, प्रविण शेन्डे, कुणाल संतापे, सचिन सरोदे,मिलींद पोपडकर , बादल, चेतन आंबागडे, गणेश हटवार, संदिप माहुलकर, सुनिल पुन्डे, प्रविण पोपडकर, आशिष टेमरे आदी परीश्रम घेत आहे.यावेळी जे सहकार्य करून मदत करण्यात इच्छुक असल्यास 9604144116, 9923808375, 8329959819, 9158240151 या मोबाईल क्रमांक वर संपर्क करावा. असे आओ साई मित्र मंडळ तर्फे विनंती करण्यात येत आहे.